Sunil Chavan Squads to monitor the petrol pump aurangabad sakal
छत्रपती संभाजीनगर

पेट्रोलपंपावर लक्ष ठेवण्यासाठी पथके

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यासाठी लस नसेल तर पेट्रोल, गॅस, रेशन मिळणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यासाठी लस नसेल तर पेट्रोल, गॅस, रेशन मिळणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथके नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान बुधवारी त्यांनी विविध ठिकाणी अचानक भेटी देऊन पाहणी केली.

काही काळ लसीकरणाची गती वाढली मात्र पुन्हा लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी झाली. दरम्यान तिसरी लाट ओसरल्याने राज्य शासनाने काही जिल्हे निर्बंधमुक्त केले आहेत. त्यासाठी पहिला डोसचे ९० टक्के, दुसरा डोसचे ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण होणे आवश्यक आहे. औरंगाबाद जिल्हा यात मागे असल्याने जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सोमवारी (ता. आठ) मंगळवारपासून लसीकरणाची गती वाढविण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येईल, असे जाहीर केले होते.

पण मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे त्यांनी बुधवारी शहरात फेरफटका मारून जालना रस्त्यावरील पेट्रोल पंप, गॅस एजन्सींना अचानक भेट दिल्या. त्यानंतर सायंकाळी बैठक घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. तसेच पेट्रोल पंपांवरील कारवाईसाठी ग्रामीणसाठी नऊ तर शहरासाठी दोन अशा ११ तहसीलदारांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. ११ नायब तहसीलदार, १६ मंडळ अधिकारी आणि १६ तलाठींचे पथक नियुक्त केले. रेशन दुकानांवर सोमवारपासून धान्य वाटप सुरू होणार आहे. त्यामुळे निर्बंधांची अंमलबजावणी सोमवारपासून होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

IPL 2026 : शाsssणा... Rohit Sharma ने कुलदीप, लोकेश यांना 'मामू' बनवलं; प्रसंग सांगताना हिटमॅन खळखळून हसला Video

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

"मी पैशांसाठी बिग बॉस केलं" लपंडाव फेम रुपालीचा धक्कादायक खुलासा ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT