छत्रपती संभाजीनगर

शेततळ्याच्या अचूक व्यवस्थापनातून सुनिता बिरंजे यांचा दुष्काळाशी लढा

CD
(लढा दुष्काळाशी) ...... थेंबाथेंबाचे नियोजन करीत द्राक्षबागेला जीवनदान शेततळ्याच्या व्यवस्थापनातून सुनीता बिरंजे यांची दुष्काळी परिस्थितीवर मात .............. थेंबाथेंबातून फुलविली द्राक्षबाग अंबेजवळगे येथील सुनीता बिरंजे यांचा जलव्यवस्थापनाचा आदर्श अविनाश पोफळे ः सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १० ः सध्या दुष्काळी स्थितीत भूजल पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चोहीकडे पाणीटंचाईच्या चिंतेने ग्रासलेले असताना आणि जनावरांना पाणी कुठे द्यायचे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला असताना धाराशिव तालुक्यातील अंबेजवळगे येथील शेतकरी सुनीता बिरंजे यांनी जलव्यवस्थापनाचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. कल्पकता आणि काटेकोर नियोजनाच्या जोरावर त्यांनी दुष्काळी परिस्थितीवर यशस्वी मात करण्याचे नियोजन केले आहे. सूक्ष्म सिंचनाचा वापर सुनीता बिरंजे यांच्याकडे एकूण तीन एकर शेती आहे. यात दोन एकर द्राक्ष बाग, अर्धा एकर कांदा आणि उर्वरित क्षेत्रात ३० बाय ३० मीटर आकाराचे शेततळे आहे. पावसाळ्यात त्यांनी कूपनलिकेच्या पाण्याने हे शेततळे पूर्ण भरून ठेवले होते. मात्र, आता वाढलेली उष्णता आणि भूजल पातळी खालावल्याने कूपनलिकेचे पाणी आटले असून, सध्या कूपनलिकेला केवळ अर्धा तास इंचभर पाणी येते. हे पाणी शेततळ्यात सोडले जाते. विशेष म्हणजे, शेततळ्यात साठवलेल्या पाण्याचा वापर पारंपरिक पद्धतीने (पाटपाणी) न करता, त्यांनी सूक्ष्म सिंचनाचा (ड्रिप व स्प्रिंक्लर) खात्रीशीर मार्ग अवलंबला आहे. द्राक्ष बागेला ठिबक सिंचनाद्वारे तर कांद्याला स्प्रिंक्लरद्वारे पाणी दिले जाते. या अचूक जलव्यवस्थापनामुळे पाण्यात तब्बल ६० टक्क्यांची बचत होत असून, याच भरलेल्या शेततळ्यावर त्यांनी आगामी आठ महिने आपली दोन एकर द्राक्ष बाग जोपासण्याचे अचूक नियोजन केले आहे. ......... शेततळे ठरले दुष्काळात वरदान गेल्यावर्षी याच द्राक्ष बागेतून त्यांना ५ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. नुकतीच बागेची ‘ऑक्टोबर छाटणी’ पूर्ण झाली असून, येत्या चार महिन्यांत यंदाचे उत्पादन हाती येणार आहे. याबाबत सुनीता बिरंजे सांगतात, की जर शेततळे नसते, तर ही बाग पूर्णपणे सोडून देण्याची वेळ आली असती. शेततळे हे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान आहे. पावसाळ्यात वाया जाणारे किंवा कूपनलिकेचे पाणी शेततळ्यात साठवून त्याचा कार्यक्षम वापर केल्यासच दुष्काळाशी यशस्वीपणे लढता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाण्याचं अचूक गणित केवळ शेततळे खोदले म्हणजे काम संपले असे नाही, तर त्यात साठवलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब मोजून वापरणे गरजेचे आहे, हे बिरंजे कुटुंबाने सिद्ध केले आहे. या शाश्वत नियोजनामुळे केवळ पिकेच जगली नाहीत, तर कुटुंबाला आणि घरातील मुक्या जनावरांनाही आज पिण्याच्या पाण्याची अडचण भासलेली नाही. भविष्यातील जलसंकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी इतर पिके घेणे तूर्तास टाळून केवळ द्राक्ष बाग जोपासण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. पाण्याचा एक एक थेंब किती मोलाचा असतो, हेच बिरंजे यांनी दाखवून दिले आहे. ....... ((कोट)) बहुतांश शेतकऱ्यांकडे आता पाणी नाही. कूपनलिका आटू लागल्या आहेत. आमचीही तशीच स्थिती झाली असती, परंतु शेततळ्यात साठविलेल्या पाण्यामुळे बाग व कांदा जगविणे शक्य झाले आहे, अन्यथा बागेचे खूप मोठे नुकसान झाले असते. - प्रशांत बिरंजे, अंबेजवळगे (ता. धाराशिव) ......... धाराशिव ः तालुक्यातील अंबेजवळगे येथील शेतकरी सुनीता बिरंजे यांच्या शेतातील पाण्याने भरलेले शेततळे. (दुसऱ्या छायाचित्रात) शेततळ्यातील पाणी ठिबक सिंचनाद्वारे देऊन जोपासलेली द्राक्ष बाग. ....... फोटो क्रमांक ः OSM26B07156, OSM26B07157

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तरुणांनो, मला तुमचा अभिमान! दिल्लीतील आंदोलनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; मोदी सरकारला दिला थेट इशारा, काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; दिल्लीत भाजपच्या आमदाराच्या लेकीला पोलिसांकडून ताब्यात! फोटो समोर

Marathi News Live Updates : काँग्रेसच्या सर्व खासदारांना रविवारी दिल्ली राहण्याच्या सुचना

Shubham Shelke Court Verdict : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेंना न्यायालयाकडून मोठा दिलासा; 5 लाखांच्या बाँडसह जामिनाचा पोलिसांचा आदेश रद्द

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

SCROLL FOR NEXT