छत्रपती संभाजीनगर

सुनीता नागरगोजे यांची महिला जिल्हाध्यक्ष, तर ज्ञानेश्वर नागरगोजे यांची उपाध्यक्षपदी निवड

CD
सुनीता नागरगोजे जिल्हा महिलाध्यक्षपदी बीड, ता. ६ (बातमीदार) ः बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने बीड जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यात श्रवण ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या प्रसिद्ध निवेदिका सुनीता नागरगोजे यांची बीड जिल्हा महिला अध्यक्षपदी, तर गायक ज्ञानेश्वर नागरगोजे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. कला व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ही जबाबदारी देण्यात आली असून, निवडीबद्दल मंचाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता शिंदे, उपाध्यक्ष तात्याराव झेंडे व कार्याध्यक्ष बाबासाहेब केदार यांचे आभार मानण्यात आले. या दुहेरी निवडीबद्दल बनकरंजा येथे मंचाचे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार मस्के आणि राज्य संघटक महादेव ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विष्णू नागरगोजे, विक्रम लांब, बापूराव थोरात, युवराज थोरात, बालाजी नागरगोजे, प्रमोद शेप, अशोक नागरगोजे, शिवराम नागरगोजे, माऊली लांब, नरसिंह लांब, रामचंद्र नेमटे, विकास लांब, बंकट नागरगोजे, देविदास लांब, गोरख नागरगोजे, सोमनाथ लांब, जोतिराम पवार, नवनाथ गिरी, राजेभाऊ लांब, शिवकन्या नागरगोजे यांच्यासह ग्रामस्थ व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

TVKच्या नेत्याला पाठलाग करत क्रूरपणे संपवलं, कोयत्याने सपासप वार; मृत्यूनंतरही वार करतच राहिले, घटना CCTVत कैद

महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार मनोज बाजपेयी; १० किलो वजन घटवलं, नवा लूक पाहून चाहते शॉक

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Chinchwad Electricity ट्रान्सफर्मरला आग, चिंचवड, वाल्हेकरवाडीसह रावेत परिसरात वीजपुरवठा खंडित; आगीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT