छत्रपती संभाजीनगर

बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत! निलंबित कर्मचाऱ्याच्या नावाचा गैरवापर करून मनोज जरांगे आणि खा. सुप्रिया सुळे यांना पाठवले बनावट पत्र

CD
--- निलंबित कर्मचाऱ्याच्या नावे जरांगे, सुळेंना पत्र ----------- बीड जिल्हा कारागृह पुन्हा चर्चेत, पोलिसांकडे तक्रार दाखल बीड, ता.१७ : कार्यालयीन कामकाजातील शिथिलतेचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलेल्या कारागृह कर्मचाऱ्याच्या नावे चक्क मनोज जरांगे आणि खासदार सुप्रिया सुळे यांना परस्पर गोपनीय पत्रव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे बीड जिल्हा कारागृह पुन्हा चर्चेत आले आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृह वर्ग-२ मधील शिपाई पदावर कार्यरत असलेले सुधाकर मुंडे यांना काही दिवसांपूर्वी कार्यालयीन कामकाजातील शिथिलतेचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या नावाचा आणि हुद्याचा गैरवापर करून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि खासदार सुप्रिया सुळे यांना परस्पर गोपनीय पत्रव्यवहार करण्यात आला. नावाचा कुणीतरी गैरवापर करून हे कारस्थान रचत असल्याचे लक्षात येताच सुधाकर मुंडे यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार अर्ज दाखल केला आहे. असा झाला प्रकार उघड सुधाकर मुंडे यांच्या निलंबनाच्या कालावधीत त्यांच्याच नावाने एक गोपनीय पत्र आणि काही कागदपत्रे असलेला मोठा लिफाफा तयार करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगर येथून मनोज जरांगे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाने हे पार्सल पोस्टाद्वारे पाठवण्यात आले होते. मात्र, या पाकिटावर पत्ता किंवा माहिती अपूर्ण व अर्धवट असल्यामुळे ते पार्सल संबंधित नेत्यांपर्यंत पोचू शकले नाही. परिणामी, पोस्ट अधिकाऱ्यांनी पानावरील क्रमांकावरून मुंडे यांच्याशी संपर्क साधत आपले पार्सल घेऊन जाण्यास सांगितले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पोस्ट अधिकाऱ्याने पार्सलचा फोटो मुंडे यांना पाठविला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. आपल्या नावाचा असा गैरवापर करून कोण दुष्ट व्यक्ती बनावट पत्रव्यवहार करत आहे, हे लक्षात येताच त्यांनी थेट पोलिसांत तक्रार दिली. कोट---- सुधाकर मुंडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात येऊन याप्रकरणी तक्रार अर्ज दिला असून, आम्ही त्याची तातडीने दखल घेत चौकशी सुरू केली आहे. चौकशीअंती यामागील बोगस कारस्थान करणाऱ्या दोषींवर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल. - शीतलकुमार बल्लाळ, पोलिस निरीक्षक, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तोच अपरकट, तेच पुढे येऊन षटकार खेचणे... वीरेंद्र सेहगावच्या लेकाची 'सेम टू सेम' बॅटिंग; आर्यवीरच्या १७३ धावांचा Video Viral

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Latest Marathi News Live Update : बुलडाण्यात सर्क्युलर रोडवर धावत्या बसला आग! युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

SCROLL FOR NEXT