छत्रपती संभाजीनगर

कमी मजूर, कमी खर्च अन् तंत्रज्ञानातून साधली समृद्ध शेती

CD
((चार अँकर)) ........... कमी खर्च, तंत्रज्ञानातून साधली समृद्ध शेती माळकरंजाच्या बाळासाहेब पाटलांची ५० एकरांतील समृद्ध शेती ठरतेय आदर्श सुनील पाटील खामसवाडी, ता. २२ ः शेती परवडत नाही आणि कामासाठी मजूर मिळत नाहीत, अशी ओरड चहूकडे होत असताना, जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील बाळासाहेब पाटील यांनी मात्र आधुनिक तंत्रज्ञान, जोडधंदे आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाच्या जोरावर शेतीला समृद्धीचा मार्ग दाखवला आहे. शिक्षकाची नोकरी सोडून तब्बल ५० एकर शेतीचा कारभार एकाकी समर्थपणे सांभाळत, कमी खर्चात भरघोस उत्पादन घेणाऱ्या बाळासाहेब पाटील यांचा हा प्रवास आजच्या तरुण शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. ....... कोरडवाहू शेतीला दिली समृद्धीची जोड १९९८-९९ मध्ये नऊ महिने शिक्षकाची नोकरी केल्यानंतर, २००० मध्ये बाळासाहेब यांनी आपल्या मूळच्या २९ एकर कोरडवाहू शेतीत उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी २००६-०७ मध्ये १५ एकर शेतीला कुंपण घालून पोल्ट्री, मुक्तगोठ्यातील शेळीपालन आणि शेततळ्यात मत्स्यपालन, असा त्रिवेणी जोडधंदा सुरू केला. शेतीकडे केवळ व्यवसाय न बघता नोकरीसारखे गांभीर्याने पाहिल्याने त्यांना आर्थिक समृद्धी मिळत गेली. यातूनच मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी नवीन २० एकर जमीन खरेदी करत आज ५० एकर शेती उभी केली आहे. ........ ५ विहिरी, ११ कूपनलिका शेतीसाठी पाण्याचे महत्त्व ओळखून त्यांनी शेतात तब्बल ५ विहिरी (ज्यात एका विहिरीची खोली १२० फूट आहे) आणि ११ कूपनलिका खोदल्या. मुबलक पाणी उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी ऊस, सोयाबीन, भाजीपाला आणि फळबागांकडे आपला मोर्चा वळवला. स्वतःच्या घराभोवतीच्या १ एकर क्षेत्रात त्यांनी सफरचंद, खजूर, अंजिर, चिकू, जांभूळ, आंबा, मोसंबी व संत्रा यांची पूर्णतः सेंद्रिय (जैविक) फळबाग फुलवली आहे. पिकांना थेट द्रवरूप खत देण्यासाठी त्यांनी घराजवळ स्लरी सिस्टीम बसवली असून, त्याद्वारे संपूर्ण शेतीला पोषण दिले जाते. सध्या त्यांच्याकडे ५ एकर पपईची बाग असून, त्यात कोथिंबीर आणि कांद्याचे आलटून-पालटून उत्पादन घेत त्यांनी ४ ते ५ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. पपईतून तब्बल ७ ते ८ लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. याशिवाय १० ते १२ एकर क्षेत्रावर ऊस पीक उभे आहे. ......... ४ वर्षांपासून एकही सालगडी नाही आज ५० एकर एवढा मोठा विस्तार असतानाही, मागील चार वर्षांपासून बाळासाहेब पाटील यांच्या शेतात एकही सालगडी (कायमचा मजूर) नाही. ठिबक सिंचनाची आधुनिक यंत्रणा, पाण्याचे योग्य नियोजन आणि स्वतःचे परिश्रम यांच्या बळावर ते एकटेच या ५० एकर शेतीचा गाडा हाकत आहेत. कमी मजुरांमध्ये आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन काढणे हेच त्यांच्या ‘स्मार्ट फार्मिंग’चे मुख्य सूत्र आहे. ........ तिफण कृषी गौरव पुरस्काराने सन्मान पाटील यांनी शेतीत केलेल्या या यशस्वी व दिशादर्शक प्रयोगांची दखल घेत, तिफण फाउंडेशनच्या वतीने २७ एप्रिल २०२६ रोजी राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या हस्ते त्यांना ‘तिफण कृषी गौरव पुरस्कार २०२५-२६’ प्रदान करून गौरवण्यात आले आहे. ......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांचा सहभाग

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT