parbhani sakal
छत्रपती संभाजीनगर

Parbhani News : हिवाळ्यातच प्रकल्प गाढू लागले तळ

पाणीटंचाईचे संकट गडद होण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट आता गडद होताना दिसत आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या प्रकल्पातील पाणीसाठी दिवसेदिवस कमी होत आहे. झपाट्याने पाणीसाठ्यात होणारी घट जिल्हा वासियांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. पाणी साठ्यात होणारी घट अशीच कायम राहीली तर, आगामी काळात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातील येलदरी व सेलू तालुक्यातील निम्न दुधना हे दोन मोठे प्रकल्प आहेत. दोन मध्यम व २२ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पातील पाणीसाठ्यावरच संपूर्ण उन्हाळ्याची भिस्त असते. मात्र सध्याच्या स्थितीला पूर्णा नदीवरील येलदरी प्रकल्प व सेलू तालुक्यातील दुधना नदीवरील निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा चिंतेचा विषय बनला आहे.

येलदरी प्रकल्पात आज घडीला केवळ ५९. १२ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पावर मुख्य म्हणजे परभणी शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. दुसरीकडे निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा तर २१ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. या दोन्ही मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा सातत्याने कमी होत चालला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा जिल्ह्यात जून महिन्यापासून आजपर्यंत केवळ सरासरीच्या ५२३ मिलीमिटर पाऊस झाला आहे. त्यामुळे त्याची टक्केवारी केवळ ६६ टक्के इतकीच येते. अश्या विपरित परिस्थितीत सध्या परभणीकर आले आहेत.

यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने अलनिनोचा जिल्ह्यातील पाणी पातळीवर परिणाम होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार जिल्हातील पाणीसाठा जपून वापरण्याच्या सुचना देखील तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आरखडा तयार करण्यात आला होता. त्या आराखड्याची अमलबजावणी करण्याची वेळ सध्या जिल्ह्यावर आली आहे.

७५ टक्क्यापेक्षाही कमी पाऊस

जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्क्यापेक्षा कमी व एकूण पावसाच्या ७५० मिलीमिटर पेक्षा कमी झाली आहे. अशा जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळापैकी ३९ मंडळात राज्य शासनाकडून १० नोव्हेंबर रोजी दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात ५ लाख ३४ हजार ८९९ हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख २० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांकडून तूट स्वरुपात झालेल्या पावसावर पेरणी केली आहे. संपूर्ण पावसाळा ७८३ मिलीमिटर पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ५२३ मिलीमिटर पाऊस झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT