छत्रपती संभाजीनगर

तखतस्नान : तखतस्नान एक पारंपरिक सोहळा

CD
(((दिवाळी लेख))) ---- तखतस्नान एक पारंपरिक सोहळा नांदेड येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिबच्या वतीने दरवर्षी उत्साहाच्या वातावरणात तखतस्नान हा सण साजरा करण्यात येतो. यात भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने या सणाप्रती सर्वांना एक मोठे आकर्षण असते. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजेच, गोदावरीतून घागरसेवा करून पाणी आणून गुरुद्वारा व परिसर स्वच्छ करण्याचा उत्साह आणि भक्तिभाव अबालवृद्धापर्यंत दिसून येतो. नांदेडच्या पावन भूमीत वर्षानुवर्षे सतत साजरा होत आलेला तखतस्नान सण युवा पिढीचा आवडता सण. मागील दोन दशकांत तखतस्नान या सणाची ख्याती जगभर झाली. -रवींद्रसिंघ मोदी, नांदेड ---- देशविदेशातील भाविकांना तखतस्नान भुरळ घालत आहे. कारण गोदावरी नदीशी संबंधित हा सण इतर कुठेही साजरा होत नाही. नांदेडमध्ये शीख धर्मीयांचा एक महत्त्वपूर्ण असा तख्त (धर्मपीठ) विद्यमान आहे. शीख धर्माचे दहावे गुरू आणि खालसा पंथाचे संस्थापक श्री गुरू गोबिंदसिंघजी महाराज यांचे हे शेवटचे वास्तव्य असलेले ठिकाण आहे. याच ठिकाणी श्री गुरू ग्रंथसाहेब यांना गुरुगादी प्रदान करण्यात आल्यामुळे हे स्थान प्रसिद्ध आहे. या ठिकाणची जुनी परंपरा येथील भाविक पाळत आलेले आहेत. पण यंदा महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात दुष्काळी स्थितीमुळे गोदावरीत पाण्याची कमतरताही समस्या समोर येणार आहे. देशात शीख धर्माचे पाच तख्त (धर्मपीठ) विद्यमान आहेत. त्यातून फक्त नांदेडलाच नदीतून सामूहिक सेवेद्वारे पाणी आणण्याची प्रथा पाळली जाते. देशात तख्त याप्रमाणे आहेत, श्री अकाल तख्त साहिब अमृतसर, तख्त हरिमन्दर साहिब पटना (बिहार), तख्त केशगढ साहिब श्री आनंदपुरसाहिब (पंजाब), तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगरसाहिब नांदेड आणि तख्त दमदमा साहिब (पंजाब) आहे. तखतस्नान सण भक्ती, सेवा, उत्साह, आनंद आणि संघठन शक्तीचा संगम असा एक प्रतीक सण होय. दरवर्षी लक्ष्मीपूजन-दिवाळी सणाच्या एक दिवसापूर्वी हा सण साजरा होतो. तखतस्नानमध्ये गुरुद्वाराची संपूर्ण इमारत पाण्याने आतून आणि बाहेरून धुवून स्वच्छ केली जाते. यानिमित्त वर्षातून एकच वेळ गुरुद्वारातील गुरुकालीन, जुने, ऐतिहासिक शास्त्रांची साफसफाई (धार देणे) या दिवशी केली जाते. श्री गुरू गोबिंदसिंघजी महाराज यांच्या सिंघासन कक्षातील (अंगीठा साहेब) सर्व ऐतिहासिक शस्त्र यावेळी बाहेर काढली जातात. याप्रसंगी शास्त्रांचे दर्शन भाविकांना करता येते. या धार्मिक प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. म्हणून, भाविकगण सामूहिकपणे तीन फेऱ्या करून गोदावरी नदीतून भक्तिभावाने घागर भरून पाणी आणतात. यात पुरुष, महिला, वृद्ध, बालकांचाही मोठा सहभाग असतो. या सणामुळे भाविकांना गोदावरी नदीची पवित्रता जपण्याची एक संधी लाभते. त्र्यंबकेश्वर येथून उगम पावलेल्या पवित्र गोदावरी मातेचे नांदेड येथे नाभिस्थान आहे असे म्हटले जाते. खरं तर तखतस्नान सोहळा धार्मिक पर्यटनाला देखील प्रोत्साहित करणारा सण ठरू शकतो. पण या सणाच्या वैभवाकडे प्रशासनाचे कधी लक्ष जात नाही. जिल्हा प्रशासन किंवा महानगरपालिका प्रशासन या सणाकडे सपशेल दुर्लक्ष करते. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेच्या वेबसाइटवर या सणाविषयी प्रचार करायला हवा. गुरुद्वारा सचखंड बोर्डाने देखील या सणाचा प्रचार प्रसार करायला हवा. सोशल मीडियाच्या माध्यमातून तखतस्नान सणाची प्रसिद्धी शीख धर्मीयांमध्ये जगभर होत आहे. नांदेडला तखतस्नान सोहळा साजरा करण्यासाठी बाहेरून पाच ते दहा हजार भाविक येथे येऊ लागले आहेत. गुरुद्वारात तखतस्नान नंतर लगेच दिवाळी दीपमाला, गुरुतागद्दी आणि परलोकगमन सोहळे पार पडतात. येथे सण साजरे करण्यासाठी भाविकांची पसंती आहे. वर्षोनुवर्षे मार्गक्रमण करत जाणाऱ्या तखतस्नान सणाला जागतिक महत्त्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. गोदावरी नदीच्याकाठी सव्वातीनशे वर्षांपासूनचा एक इतिहास आहे. त्याची दखल राज्य शासन आणि केंद्र शासनाने घ्यावी, अशी भावना व्यक्त करून सर्वांना दिवाळी आणि श्री गुरू ग्रंथसाहेब गुरुतागद्दी सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा! ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Latest Marathi News Live Update: : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली आनंददायी दिवाळी; 'नंदनवन' बंगल्यावर फराळ वाटप करत दिल्या शुभेच्छा

Siddi Community Marathi Song Viral Video : आफ्रिकन लूक अन् अस्सल मराठी गावरान ठसका; माठावर ठेका धरत सिद्दी तरुणांनी गायले ‘हिरो होंडा’ गीत

SCROLL FOR NEXT