Sewage water has accumulated on a road in Ward 5 of Tamsa, causing inconvenience to local residents.
esakal
तामसा : तामसा शहरातील अंतर्गत रस्ते व नाली बांधकामावर लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही नागरिकांच्या समस्या कायम आहेत. शहरातील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये नालीचे पाणी रस्त्यावरच तुंबल्याने परिसराला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी शेजारील रिकाम्या प्लॉटचा रस्ता म्हणून वापर करावा लागत आहे.
येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस सुमारे ४० फूट लांबीपर्यंत नालीचे पाणी रस्त्यात साचले आहे. या साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, लहान मुले आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या समस्येकडे स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींचे अनेकदा लक्ष वेधले.
संबंधितांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि समस्या सोडविण्याचे आश्वासनही दिले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
दीड किलोमीटरचा वळसा
विशेष म्हणजे, दोन भागांना जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. सध्या नागरिक शेजारील रिकाम्या प्लॉटमधून ये-जा करतात. मात्र, प्लॉटधारकाने भविष्यात बांधकाम केल्यास नागरिकांचा हा मार्ग बंद होणार असून, त्यांना दीड किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.