टाटा प्रोजेक्ट्सला जागतिक वाहन कंपनीच्या प्रकल्प उभारणीचे कंत्राट
बिडकीनमध्ये असेंब्ली, प्रेस आणि वेल्ड शॉपसह तीन प्रमुख विभागांची उभारणी करणार
छत्रपती संभाजीनगर, ता. ४ : ऑरिक-बिडकीन औद्योगिक क्षेत्रात जागतिक स्तरावरील एका वाहननिर्मिती कंपनीचा नवीन कारखाना उभारण्यात येणार आहे. या ग्रीनफिल्ड प्रकल्पातील तीन प्रमुख विभागांच्या उभारणीचे कंत्राट टाटा समूहातील टाटा प्रोजेक्ट्सला मिळाले आहे. टाटा प्रोजेक्ट्स कंपनीने मंगळवारी (ता. तीन) यासंदर्भात घोषणा केली.
या प्रकल्पात असेंब्ली शॉप, प्रेस आणि वेल्ड शॉप तसेच युटिलिटी आणि सपोर्ट बिल्डिंग उभारण्यात येणार आहेत. यामध्ये स्थापत्य, संरचनात्मक आणि वास्तुरचनात्मक कामांसह यांत्रिक, विद्युत व प्लंबिंग यंत्रणांची उभारणी केली जाईल. तसेच औद्योगिक सुविधांसाठी आवश्यक सेवा-जाळे, चाचणी, यंत्रणा कार्यान्वित करणे आणि अंतिम हस्तांतरणाची जबाबदारीही टाटा प्रोजेक्ट्सकडे असेल. कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य विकास व धोरण अधिकारी राजीव मेनन यांनी या करारामुळे प्रगत उत्पादन क्षेत्रातील कंपनीची उपस्थिती वाढणार असल्याचे सांगितले. सुरक्षितता, गुणवत्ता आणि वेळेत काम पूर्ण करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संबंधित वाहननिर्मिती कंपनीचे नाव, प्रकल्पाची गुंतवणूक, उत्पादन क्षमता आणि रोजगारनिर्मितीचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. या प्रकल्पामुळे बिडकीनच्या औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.