छत्रपती संभाजीनगर

चार वर्षांचे शिक्षक पुरस्कार एकाचवेळी होणार वितरित

CD
चार वर्षांच्या शिक्षक पुरस्काराचे एकाचवेळी वितरण यंदा चार वर्षांचे शिक्षक पुरस्कार ------- चाकूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा पुढाकार; शिक्षकांमध्ये समाधान चाकूर, ता. ४ (बातमीदार) : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या योगदानाची दखल घेऊन दरवर्षी तालुकास्तरावर शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. मात्र, येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांचे वितरण झाले नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी होती, यावर्षी सप्टेंबर महिन्यातच पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्यामुळे शिक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांची निवड करून त्यांचा तालुकास्तरावर शिक्षक पुरस्काराने सन्मान केला जातो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी, नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. मात्र, मागील तीन वर्षांत पुरस्कार वितरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. पंचायत समितीमध्ये प्रशासकीय कारभार सुरू असल्याने तसेच कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नसल्यामुळे पुरस्कार रखडल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे पात्र शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या कार्याची दखल घेऊन मिळणाऱ्या पुरस्काराची शिक्षक आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, पंचायत समितीच्या नूतन सभापती जयश्री नागरगोजे व गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे यांनी रखडलेले शिक्षक पुरस्कार वितरित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांसह यावर्षीचा पुरस्कार अशा चार वर्षांच्या पुरस्कारांचे एकाच वेळी वितरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षकांच्या कार्याचा सन्मान होणे ही केवळ पुरस्काराची बाब नसून त्यातून शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करण्यासाठी इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळते. त्यामुळे रखडलेले पुरस्कार वेळेत वितरित करण्याच्या निर्णयाचे शिक्षकवर्गातून स्वागत होत आहे. कोट--- शिक्षकांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. पुरस्कारामुळे संबंधित शिक्षकाचा उत्साह वाढतोच, शिवाय इतर शिक्षकांनाही नावीन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे पुढील काळात शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया नियमितपणे राबवली जाणार असून सप्टेंबर महिन्यातच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. -जयश्री नागरगोजे, सभापती पंचायत समिती चाकूर -- मागील तीन वर्षांतील पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड प्रक्रिया झालेली आहे. तांत्रिक अडचणीमुळे पुरस्काराचे वितरण झाले नाही, यावर्षी निवड करावयाच्या पुरस्कारासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून यातून निवड करून लवकरच पुरस्कार वितरण होणार आहे. - मंदोदरी वाकडे, गटशिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात डीजेबंदी होणार? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? विद्यानंद बापटांच्या मराठीचं केलं कौतुक

Alcohol Seized : गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा शिरूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केला जप्त; दोन वाहने ताब्यात

Stray Dog Attack : उंब्रज येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार! ८० वर्षीय आजी गंभीर जखमी; चार गायी अन् पाळीव प्राण्यांवर हल्ला

Marathi News Live Updates : पुण्यात डीजेविरोधात आणि वाहतूक कोंडीच्या विरोधात आंदोलनाची हाक

Maratha Reservation : २२ गावांतील मराठा बांधवांचा महामार्गावर रास्ता रोको

SCROLL FOR NEXT