छत्रपती संभाजीनगर

कोर्टाच्या आदेशानंतरही शिक्षिकेला सिल्लोडला रुजू होऊ दिले नाही

CD
कोर्टाच्या आदेशानंतरही शिक्षिकेला सिल्लोडला होऊ दिले नाही रुजू .... मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश ..... छत्रपती संभाजीनगर, ता. २२ : न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही शिक्षिकेला सिल्लोड येथे रुजू होऊ न दिल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना पुढील सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठासमोर १६ ऑक्टोबर रोजी सुरेखा काशीनाथ थोरात यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने यापूर्वी २१ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार संबंधित शिक्षिकेला सिल्लोड येथे रुजू होण्याची संधी देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना सिल्लोडऐवजी पैठण येथे हजर राहण्यास सांगण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १६ ऑक्टोबर रोजी शिक्षिकेचे मुख्यालय पैठणऐवजी सिल्लोड येथे बदलण्याचा आदेश काढल्याची माहिती प्रतिवादींच्या वकिलांनी न्यायालयात दिली. आदेशाची अंमलबजावणी झाल्याने यापूर्वीचे निर्देश मागे घेण्याची विनंतीही करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ही विनंती मान्य केली नाही. २१ सप्टेंबरच्या स्पष्ट आदेशानंतरही शिक्षिकेला सिल्लोड येथे रुजू होऊ न देता पैठण येथे हजर राहण्यास भाग पाडल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले. त्यामुळे यापूर्वी दिलेले निर्देश कायम ठेवण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून, त्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी न्यायालयात उपस्थित राहावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. प्रसाद जरारे, राज्य सरकारतर्फे सहायक सरकारी वकील एन.बी. कांबळे, तर प्रतिवादीतर्फे ॲड. पी.आर. नांगरे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी गुड न्यूज? आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! थकबाकीबाबतही उत्सुकता

Diwali Furniture Polishing Tips: दिवाळीच्याआधी लाकडी फर्निचर चमकवायचंय? घरातल्याच 'या' वस्तू येतील उपयोगी

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

MBBSच्या विद्यार्थ्यांना दिलासा! अतिरिक्त परीक्षेची संधी; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मोठा निर्णय

SANJU SAMSON RECORD: जगात भारी संजू सॅमसनचा विक्रम! जोस बटलरला मागे टाकत २००+ स्ट्राइक रेटने नवा विक्रम;T20 क्रिकेटमध्ये बनला नंबर वन!

SCROLL FOR NEXT