छत्रपती संभाजीनगर

''आरंभ''च्या विशेष शिक्षकांचा गौरव

CD
ABD26J78737 छत्रपती संभाजीनगर ः शिक्षक दिनानिमित्त ‘आरंभ’मध्ये ज्येष्ठ शिक्षिका मधुरा गोरे आणि संस्थापक अंबिका टाकळकर यांच्यासह ‘आरंभ’चे विशेष शिक्षक आणि कर्मचारी. ---- ‘आरंभ’च्या शिक्षकांचा गौरव छत्रपती संभाजीनगर, ता. ६ : आरंभ स्वमग्न मुलांच्या शाळेत शिक्षक दिनानिमित्त शनिवारी (ता. पाच) विशेष शिक्षक आणि समुदाय शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. दिव्यांग मुलांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठी अहोरात्र झटणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्या मधुरा गोरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी शिक्षक पल्लवी सोनवणे, श्वेता शिंदे, नीलिमा वावरे, शीतल बोडखे, विजयश्री जाईबहार, थेरपिस्ट वृषाली पतंगे, मानसी बुंदेले, व्यावसायिक प्रशिक्षणाचे काम करणारे शोएब शेख यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. याशिवाय कम्युनिटी टीचर म्हणून कार्य करणाऱ्या आम्रपाली जाधव, राणी परदेशी, शमाबाला कौटकर, मिराज शेख, गिरिधर चव्हाण यांचाही सन्मान केला. मुलांना दैनंदिन जीवनातील कामे शिकवणाऱ्या सेविका मालनबाई बिरूटे, योगिता कुंजारे आणि रजिया शेख यांचाही यावेळी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आरंभच्या संस्थापक अध्यक्ष अंबिका टाकळकर यांनी केले. कार्यक्रमासाठी अजय वाहुळ, रोहिणी बाविस्कर, किरण अंकुशे, गणेश वाघ आदींनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

Yoga For Everyone: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी 'ही' आहेत सर्वोत्तम योगासने! आरोग्य अन् मानसिक शांतीची पक्की गॅरंटी...

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

SCROLL FOR NEXT