छत्रपती संभाजीनगर

८ ते १० हजार शिक्षकांची पदे कमी होण्याची भीती

CD
संचमान्यतेच्या अटींविरुद्ध उद्या शिक्षकांचा पुण्यात मोर्चा -- छत्रपती संभाजीनगर, ता. २ : कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेसाठी लागू केलेल्या जाचक अटींमुळे हजारो शिक्षकांची पदे कमी होण्याची शक्यता आहे. याच्या निषेधार्थ कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघातर्फे शुक्रवारी (ता. चार) पुण्यात शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघटनेने केले. याबाबत विवेकानंद महाविद्यालयात जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेची बैठक झाली. कनिष्ठ महाविद्यालयांची संचमान्यता प्रचलित पद्धतीने करावी आणि शिक्षकांची पदे कमी करण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संचमान्यतेच्या नियमांविरोधात महासंघाने यापूर्वी विविध टप्प्यांवर आंदोलने केली. मात्र, त्यानंतरही नियमांमध्ये बदल झालेला नसल्याचा आरोप संघटनेने केला. राज्यभरात सुमारे ८ ते १० हजार शिक्षकांची पदे कमी होण्याची शक्यता असल्याचा दावा महासंघाने केला. विभागातील पाचही जिल्ह्यांतही अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याचीही परिस्थिती निर्माण झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. शुक्रवारी दुपारी एकला पुण्यातील शनिवारवाड्यापासून या मोर्चाला सुरवात होईल, असे उपाध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील, सचिव प्रा. गोविंद शिंदे, प्रा. चंपालाल कहाटे, प्रा. डी. एल. हिवरे, प्रा. अरूण काटे यांनी सांगितले. ---- विद्यार्थीसंख्येनुसार विषयांचा कार्यभार द्या तासिका पूर्वीप्रमाणे ४५ मिनिटांची करावी, प्रात्यक्षिक बॅचमधील विद्यार्थ्यांची संख्या ३० ऐवजी २० करावी आणि तुकडीतील विद्यार्थीसंख्या विचारात घेऊन विषयांचा कार्यभार निश्चित करावा, या मागण्याही महासंघाने केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन सिंदूर'च्या नायकाकडे राम मंदिराची जबाबदारी, निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा ट्रस्टचे नवे CEO

Dilip Walse Patil : डिंभे-माणिकडोह बोगद्याला विरोध कायम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिका, 'थोडा वेळ देऊ, त्यानंतर पुढील रणनीती ठरवू'

Mumbai Sawantwadi Express : आजपासून मुंबई-सावंतवाडी रोजची एक्स्प्रेस धावणार! सीएसएमटी येथे मुख्यमंत्री फडणवीस दाखवणार हिरवा झेंडा

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

SCROLL FOR NEXT