sanbhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : कुणबी नोंदी तपासणीसाठी पथक सोयगावात

फेरतपासण्या सुरू केल्याची माहिती तहसीलदार मोहनलाल हरणे यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

सोयगाव : मराठा समाजाला मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी यापूर्वी झालेल्या कुणबीच्या नोंदी कमी प्रमाणात आढळून आल्यामुळे गुरुवारपासून जिल्हाभरात शिंदे समितीचे विशेष फेरतपासणी पथके दाखल झाले असून सोयगावातही पथकाने विशेष फेरतपासण्या सुरू केल्याची माहिती तहसीलदार मोहनलाल हरणे यांनी दिली.

कुणबीच्या नोंदीच्या फेरतपासणीसाठी सोयगाव तहसील कार्यालयात हिंगोलीच्या अपर तहसीलदार सावित्री सुरे, वसमतचे मंडळ अधिकारी विनायक किनलकर, भूमी अभिलेख कार्यालयाचे शिवलिंग मुळे यांचे विशेष पथक सोयगाव तहसील कार्यालयात दाखल झाले आहे.

विशेष समितीच्या समक्ष तहसीलदार मोहनलाल हरणे यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी पोलिस पाटील आदींनी सोयगावच्या अभिलेख कक्षामधील महसुली दस्तऐवज अभिलेखे तपासणी हाती घेतली आहे.

यावेळी तहसील कार्यालयाचे महसूल सहायक शरद पाटील, नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे, विठ्ठल जाधव, हेमंत तायडे आदींनी अभिलेख तपासणी केली. शुक्रवार (ता.८) पर्यंत ही तपासणी सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT