Sambhaji nagar esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : कुणबी-मराठा नोंदीसाठी तहसीलनिहाय शोधमोहीम सुरू

छत्रपती संभाजीनगर, लातूर, आणि नांदेडात आढळले कमी पुरावे

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांत कुणबी - मराठा पुरावे लोकसंख्येच्या मानाने कमी प्रमाणात आढळले. त्यामुळेच हिंगोलीच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरातील पुरावे शोधण्याचे काम प्रत्येक तहसीलनिहाय सुरू केले आहे. या पथकाने तहसीलदार, नायब तहसीलदारांची बैठक घेत सूचना दिल्या. याशिवाय पथकाची दोन टप्प्यांत विभागणी करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांत पुरावे कमी प्रमाणात आढळून आल्याने न्या. संदीप शिंदे यांच्या समितीने नाराजी व्यक्त केली. कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदी असलेल्या दस्तांची फेरतपासणी करावी, असे आदेश न्या. शिंदे समितीने दिल्यानंतर आता हिंगोलीहून आलेल्या पथकाने तालुकानिहाय अभिलेख कक्षातील आढावा घेण्यास सुरवात केली आहे.

आणखी पुरावे शोधण्यासाठी तालुकानिहाय पुरावे उघडून पाहिले जात आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांत जिल्हा प्रशासनाने १९ लाख ३८ हजार ११५ पुरावे तपासले होते. त्यात १ हजार २७८ कुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आल्या आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पुरावे आढळल्याने हिंगोलीतील अपर जिल्हाधिकारी प्रवीणकुमार धरमकर, उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा, अपर तहसीलदार एस. डी. सुरे यांचे पथक पुरावे शोधण्यासाठी शहरात दाखल झाले आहे. ८ डिसेंबरपर्यंत हे पथक पुन्हा पुराव्यांची शोधाशोध करणार आहे.

अशी होतेय शोधाशोध

शोधमोहिमेत खासरापत्रक, पाहणीपत्रक, कूळ नोंदवही, १९५१ चे राष्ट्रीय रजिस्टर, हक्क नोंदपत्र, फेरफार पत्र, सातबारा, गाव नमुना, प्रवेश निर्गम नोंदवही, अनुज्ञप्ती नोंदवही, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना नोंद, कारागृहातील नोंदी, गाववारी, गोपनीय रजिस्टर, क्राइम रजिस्टर, अटक पंचनामे, एफआयआर, मुद्रांक विभागातील १३ प्रकारचे दस्तऐवज, भूमी अभिलेखामधील सात दस्तऐवज, मुंतखब आदी अभिलेखातील नोंदी घेण्याचे राहून गेले की काय याचा आढावा पथक घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, आता 'या' क्षेत्राला केले लक्ष्य; १ नोव्हेंबरपासून जगभरात होणार लागू

Nanded Love Affair : प्रेमसंबंधातून प्रेमीयुगुलानं प्राशन केलं विष; घरच्यांचा होता विरोध, असं काय घडलं? दोघांना उचलावं लागलं टोकाचं पाऊल!

Latest Marathi News Live Update : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लवकरच होणार घोषणा, प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु

Cough Syrup Testing: कफ सिरपचे नमुने घेण्‍यास सुरुवात ‘एफडीए’ पुण्यात इतर कंपन्‍यांच्या औषधाचीही करणार तपासणी

Supreme Court : ''क्रिकेट खेळ राहिला नाही, व्यवसाय बनलाय''; सुप्रीम कोर्टाला असं म्हणण्याची वेळ का आली?

SCROLL FOR NEXT