छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची तेलंगणा अभ्यास दौऱ्यासाठी निवड

CD
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची तेलंगण अभ्यास दौऱ्यासाठी निवड ----- माजलगाव, ता. २ (बातमीदार) : समग्र शिक्षा आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय आविष्कार अभियान २०२५-२६ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा छत्रबोरगाव येथील चार तसेच शहरातील पीएमश्री जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेतील दोन अशा एकूण सहा विद्यार्थांची तेलंगण अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा छत्रबोरगावचे अशोक नागेश बेद्रे, श्रावणी सतीश जाधव, संस्कृती बालासाहेब जाधव, पृथ्वी रामेश्वर शिंदे या चार तर शहरातील पीएमश्री जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेतील तनुजा हनुमंत कोल्हे, दीपाली दिगंबर शेळके यांचा समावेश आहे. अभ्यास दौरा तीन सप्टेंबरपर्यंत असणार आहे. या दौऱ्यात विद्यार्थ्यांना हैद्राबाद येथील विविध राष्ट्रीय संशोधन संस्था,विज्ञान केंद्र आणि ऐतिहासिक वास्तूंना प्रत्यक्ष भेटी देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन व आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या यशाबद्दल मुख्याध्यापक मिलिंद गरबडे, मंदा सारूक, जयश्री लोणीकर, ज्योती कोडगीरकर, संगीता राठोड, शीतल राठोड, संगीता शिंदे, सुनंदा पाचणकर, हिरा मगर, शिवानी शेरकर, बाळासाहेब सोनसळे, शरद नायबळ, सुंदर काळे, नारायण भाळशंकर, चंद्रकांत यादव, बालासाहेब कांबळे, हनुमान शेरकर, शेख अब्दुल, प्रवीण बनसोडे, हसीब सौदागर, संतोष साळवे यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

सर्किटचा ‘डार्क’ अवतार! अर्शद वारसीच्या ‘महाराज’ भूमिकेने वाढवलं ‘घमासान’चं गूढ, खाकी वर्दीत प्रतीक गांधींचा दमदार अंदाज

SCROLL FOR NEXT