telecouncling telecounseling by doctor
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाकाळात आता फोनवर घेऊ शकता येईल आरोग्य सल्ला

सीएसएमएसएस आयुर्वेद रुग्णालयाचा उपक्रम

- अतुल पाटील

औरंगाबाद: छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था (CSMSS) संचालित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोरोनाच्या काळात संकटातून बचाव करण्यासाठी ‘फोनवर घेऊ शकता आरोग्य सल्ला’ हा उपक्रम सुरू केला आहे.

भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद, आयुष मंत्रालय यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार टेली मेडिसिन व टेली कन्सलटेशनची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार, कोरोनापासून बचाव करण्यासाठी तसेच त्याबाबतची लक्षणे दिसत असल्यास किंवा कोरोना होउन गेल्यानंतरचा आरोग्य सल्ला रुग्ण घेऊ शकतात. तसेच रुग्णांच्या समस्यांचे निदान करता येईल, ही सुविधा टोल फ्री क्रमांक 18002101617 यावर सोमवार ते शुक्रवार सकाळी साडे नऊ ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते साडे चार तसेच शनिवारी सकाळी साडे नऊ ते एक वाजेपर्यंत असेल.

आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख म्हणाले, कोरोना किंवा इतर कुठल्याही आजाराबाबत आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी टोल फ्री क्रमांकावर दिलेल्या वेळेत फोन करा. आमचे डॉक्टर नक्कीच आपल्या आरोग्याची समस्या तात्काळ सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करतील. यामध्ये मेडिसिन (कायचिकित्सा), ईएनटी, सर्जरी, नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती , पंचकर्म, योग व प्राणायाम आहाराबद्दल माहिती तसेच व्याधीअमत्व कोविड आजार होऊन गेलेल्यांबद्दल काही तक्रारी असल्यास, लसीकरणाबद्दल माहिती, मार्गदर्शन आणि इतरही आजाराविषयी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर निवारण करतील. या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे आणि सचिव पद्माकर मुळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT