Maharashtra Temperature Update 
छत्रपती संभाजीनगर

आगामी काळात तापमानात होणार घट; मराठवाडा कृषी विद्यापीठाचा अंदाज

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

परभणी : आगामी दोन दिवसांनंतर हळूहळू जिल्ह्याच्या तापमानात एक ते दोन अंशांनी घट होणार आहे, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम विभागाने शनिवारी (ता. दोन) व्यक्त केला.

परभणीच्या तापमानाचा पारा सध्या ४० अंशांपुढे सरकलेला आहे. त्यामुळे जिल्हाभरात उन्हाचा कडाका वाढला आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट आहे. शुक्रवारी परभणीचे तापमान ४१.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्यात शनिवारी थोडी घट दिसून आली. शनिवारी परभणीचा पारा ४०.९ अंश सेल्सिअस इतका होता. तापमानाचा पारा अजून दोन दिवस असाच राहणार असून, त्यानंतर तापमानात थोडी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तापमान १ ते २ अंशाने खाली येईल, असे शक्यता वर्तविण्यात आली असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT