औरंगाबाद : दुभंगलेले दहा संसार पुन्‍हा आले जुळून sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : दुभंगलेले दहा संसार पुन्‍हा आले जुळून

आठ प्रकरणे तडजोडीने निकाली : लोकअदालतीमुळे यश

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : क्षुल्लक कारणांवरून झालेले समज-गैरसमज, पैशांचा तगादा, सासरच्यांकडून होणारा त्रास अशा काही कारणांमुळे घटस्फोटांच्या पावित्र्यात असलेले ३२ पैकी १० संसार पुन्हा जुळण्यात मदत झाली असून शनिवारी (ता. ११) कौटुंबिक न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमुळे हे संसार पुन्हा एकोप्याने सुरु झाले आहे.

न्यायालयात एकूण ३२ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यात दोन्ही बाजूंची २० जोडपी हजर राहिली. त्‍यापैकी १८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातील १० प्रकरणांत समेट झाला असून असून दुभंगलेले संसार पुन्हा जुळवण्याच्या दृष्टीने मार्ग निघाला.

आठ प्रकरणांमध्‍ये तडजोडीने निकाली निघाली. तर १२ प्रकरणांमध्‍ये पक्षकार गैरहजर राहिले. राष्ट्रीय लोक अदालत कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश आय. जे. नंदा, न्‍यायाधीश आशिष अयातिच यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कौटुंबिक न्‍यायालयाच्‍या पॅनेलवर निवृत्त न्‍यायाधीश दिलीप खोत यांची पॅनल प्रमुख म्हणून तर विधिज्ञ माधुरी अदवंत व समुपदेशक मनिषा कांदे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. या लोक अदालतसाठी प्रभारी प्रबंधक एस. आर. दाणी, अधीक्षक कल्याण पागिरे आणि कौटुंबिक न्‍यायालयातील कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT