छत्रपती संभाजीनगर

अतिक्रमित घराचे प्रस्ताव पाठवण्यासाठी ग्रामपंचायत उदासीन

CD
अतिक्रमित घरांचे प्रस्ताव पाठवण्यासाठी ग्रामपंचायत उदासीन टेंभुर्णी, ता. ९ : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे जवळपास एक हजार घरे अतिक्रमित असून, शासनाच्या नियमानुसार ही घरे नियमाकुल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे अद्याप नियमाकुल करण्यासाठीचे प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आलेले नाहीत. अतिक्रमित घरे नियमाकुल करण्याचे प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठवावेत, अशी मागणी येथील शेख फसर शेख रऊफ यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनात म्हटले की, टेंभुर्णी येथे जवळपास एक हजार घरे अतिक्रमित असून, ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अतिक्रमित घरांचे नियमाकुल करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. मात्र, टेंभुर्णी येथून अद्याप एकही प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्याची कार्यवाही ग्रामपंचायतीने केलेली नाही. या संदर्भात आमदार संतोष दानवे यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांना आपापल्या गावातील अतिक्रमित घरे नियमाकुल करण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच, प्रस्तावाची एक प्रत आपल्याकडे जमा करण्याचे तोंडी आदेशही दिले होते. तरीही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. परिणामी, गोरगरीब नागरिकांना त्यांच्या घरांपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे अतिक्रमित घरे नियमाकुल करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून तातडीने प्रस्ताव पाठवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

SCROLL FOR NEXT