वरुण सरदेसाई  
छत्रपती संभाजीनगर

तेजस ठाकरेंना युवासेना प्रमुख करायचा निर्णय कुटुंब घेईल: सरदेसाई

मधुकर कांबळे

औरंगाबाद : तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांना वन्यजीवाची आवड आहे. त्यातच ते रमत असतात. त्यांना जर युवासेनेचे प्रमुख करायचे असेल तर त्याबद्दलचा निर्णय ते स्वत: आणि त्यांचे कुटुंब घेईल, असे मत युवा सेनेचे (Yuva Sena) सचिव वरुण सरदेसाई (Varun Desai) यांनी व्यक्त केले आहे. युवासेना पदाधिकारी संवाद दौऱ्याच्या निमित्ताने वरुण सरदेसाई औरंगाबादेत आले आहेत. त्यांच्या या दौऱ्याचे निमित्तसाधून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी (ता.१३) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात ते बोलत होते. तेजस ठाकरे यांना युवासेनेचे प्रमुख करण्याच्या हालचाली सुरु आहेत. याबाबत पत्रकारांनी श्री.सरदेसाई यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, तेजस ठाकरे वन्यजीवप्रेमी आहेत. त्यांनी वन्यजीवांच्या सहा ते सात प्रजाती शोधून काढल्या आहेत. ते त्यातच रमत असतात. राजकारणात त्यांना यायचे असेल तर त्याबद्दलचा निर्णय ते स्वत: आणि त्यांचे कुटुंब घेईल. पण त्यांची आवड वन्यजीवात आहे हे निश्चित.

दौऱ्याबाबत श्री. सरदेसाई म्हणाले, की आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसारच पदाधिकारी संवाद दौरा सुरु केला आहे. तेच युवासेनेचे नेते आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. संवाद दौऱ्याला पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आले आहे. दोन महिन्यापूंर्वी आपण औरंगाबाद दौऱ्यावर आलो होतो. तेव्हा युवासेनेच्या मुलाखती झाल्या होत्या. त्यातूनत चार जिल्हाप्रमुख नेमण्यात आले. युवासेनेची टीम अजूनही मोठी होईल, असा विश्वास श्री.सरदेसाई यांनी व्यक्त केला. बीड आणि जालना येथील पदाधिकारी संवाद कार्यक्रमात मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी करोनाचा नियमभंग करणारी नाही का? मुख्यमंत्र्यांनी राजकीय कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही, नाट्यगृह देखील बंद ठेवण्यात आले आहेत, असे असताना तुम्हाला नाट्यगृह कसे मिळाले, गर्दी झाली हा नियमभंग नाही का असा सवाल श्री.सरदेसाई यांना विचारला गेला. त्यावर ते म्हणाले, की आम्ही पदाधिकाऱ्यांसाठीच तो कार्यक्रम आयोजित केला होता. पण करोनाकाळामुळे खूप महिन्यांची राजकीय कार्यक्रम होत असल्याने कार्यकर्ते उत्सुकतेने आले. आमची काही चुक झाली असेल, नियमांचा भंग झाला असेल तर प्रशासन कारवाई करेल, त्यांनी ती करावी.

महापालिका निवडणूक

औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुरेशा प्रमाणात संधी द्यावी, अशी भूमिका आपण घेणार आहात का? असे वरुण सरदेसाई यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की या बद्दल आपण आग्रही नाही. शिवसेनेचे नेते याबद्दल योग्य तो निर्णय घेतील, असे श्री.सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT