छत्रपती संभाजीनगर

ठाकरे उद्यानात नागरिकांचा लोकप्रतिनिधींचा संवाद

CD
ठाकरे उद्यानात नागरिक-लोकप्रतिनिधी संवाद छत्रपती संभाजीनगर ः नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात थेट संवाद व्हावा, या उद्देशाने ठाकरे उद्यान मित्रमंडळातर्फे बाळासाहेब ठाकरे उद्यानात दीपावली स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने उद्यानाचा विकास आणि परिसरातील नागरी समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली. कार्यक्रमाला प्रभागाचे नगरसेवक राजगौरव वानखेडे, किशोर नागरे, पुष्पा रोजतकर, सुवर्णलता साळवे यांच्यासह माजी नगरसेविका स्वाती नागरे, रमण साहुजी, ग. मा. पिंजरकर, सागर पाले व शुभम गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जिद्नेश खंडाळकर व पल्लवी शहा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स. सो. खंडाळकर यांनी प्रास्ताविक केले. उद्यानाचे सुशोभीकरण, स्वच्छता, हिरवळ, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधा, व्यायामाची साधने तसेच परिसरातील रस्ते, पाणी आणि ड्रेनेज समस्यांबाबत नागरिकांनी सूचना मांडल्या. त्यावर प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन राजगौरव वानखेडे यांनी अध्यक्षीय समारोपात दिले. सूत्रसंचालन मोहन भोमे यांनी, तर आभार बाबुराव रणयेवले यांनी मानले. कार्यक्रमासाठी रवींद्र भाले, बी. झेड. पाटील, रायभान पाटील, राजेंद्र जैस्वाल, शोभा शिनगिरवार, रेखा दाभाडे, महेंद्र डेरे, अशोक साळवे, प्रशांत वैद्य, जगदीश पुरी, रजनी रामगीरवार यांनी पुढाकार घेतला. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: ग्राहकांसाठी महत्त्वाचे! देशात उद्या 45 मिनिटं बंद राहणार यूपीआय सेवा; पैशांची देवाण-घेवाण होणार नाही

रुपाली चव्हाण यांची राष्ट्रीय योगा रेफ्री पदावर नियुक्ती

Junnar Farmers : शेतीचा वाढता उत्पादन खर्च रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा निर्णय; बनकर फाट्यात कांदा लागवड ७००, पुरुष मजुरी ८०० आणि इतर कामांसाठी ५०० रुपये दर

Instagram वर ब्लू टिकसाठी आता पैसे देण्याची गरज नाही! जाणून घ्या अकाउंट मोफत व्हेरिफाय करण्याची सोपी ट्रिक...

Satara Bank Election: जिल्हा परिषदेचा बदला घेतला, शिवसेना-राष्ट्रवादीनं भाजपचा वचपा काढला

SCROLL FOR NEXT