sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : तिबेटियन विक्रेत्यांनी दुकाने गुंडाळल्यावर वाढली थंडी ; चौदा वर्षांतील सर्वाधिक फटका, चाळीस दुकाने बंद

मध्यंतरी हिवाळा सुरू होऊनही तापमान वाढून थंडी गायब झाली होती. हवामानाचा अंदाज घेत बहुतांश तिबेटियन व्यापाऱ्यांनी दुकाने गुंडाळून घर गाठले. त्यानंतर आता मात्र पुन्हा थंडी पडली आहे. या संभ्रमित वातावरणामुळे तिबेटियन मार्केटमधील व्यापाऱ्यांना गेल्या १४ वर्षांतील सर्वाधिक फटका बसला आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मध्यंतरी हिवाळा सुरू होऊनही तापमान वाढून थंडी गायब झाली होती. हवामानाचा अंदाज घेत बहुतांश तिबेटियन व्यापाऱ्यांनी दुकाने गुंडाळून घर गाठले. त्यानंतर आता मात्र पुन्हा थंडी पडली आहे. या संभ्रमित वातावरणामुळे तिबेटियन मार्केटमधील व्यापाऱ्यांना गेल्या १४ वर्षांतील सर्वाधिक फटका बसला आहे. येथील व्यापाऱ्यांनी आतापर्यंत जवळपास चाळीस दुकाने बंद केली असून उर्वरित दुकानेही दोन दिवसांत बंद करणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

दरवर्षी दिवाळीत कडाक्याची थंडी जाणवते. पण, यंदा दिवाळीत थंडी जाणवलीच नाही. त्यातच १० ऑक्टोबर ते ३० जानेवारी दरम्यान उबदार कपड्यांचे तिबेटियन मार्केट ग्राहकांसाठी खुले होते. २००९ ते २०२३ या चौदा वर्षांदरम्यान आतापर्यंत आम्हाला सर्वाधिक तोटा सहन करावा लागला असल्याचे तिबेटियन स्वेटर विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष एस. डी. चौबेल यांनी सांगितले. मधल्या काळात वातावरणातील बदलामुळे सर्वाधिक उष्णता जाणवली. यामुळे उबदार कपडे खरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. मार्केटमध्ये जवळपास पन्नास दुकाने होती.

त्यातील अनेक दुकानांतील विक्रीविना माल तसाच पडून होता. परिणामी, त्यामुळे वेळेआधीच काही दुकाने बंद करावी लागली. मोजकीच दुकाने सुरू होती, पुढे तेही बंद करावी लागतील. हिवाळ्यात स्वेटर विक्रेत्यांच्या हाती मात्र मुद्दलही मिळाली नाही, अशी व्यथा काही विक्रेत्यांनी व्यक्त केली. दरम्यान, आता दुकानदार परतल्यानंतर थंडी परतली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. आता पुन्हा येणे परवडणारे नाही. त्यामुळे पुढील वर्षीच येणार असल्याचेही काही विक्रेत्यांनी सांगितले.

अशी झाली सुरवात

शहरात १९८० ते ८५ दरम्यान तिबेटियन विक्रेते विविध भागांत दुकाने लावत होते. १९८६ ते २००० दरम्यान सर्व तिबेटियन विक्रेत्यांनी एकत्र संघटित होत मध्यवर्ती बस स्थानकाबाहेरील फुटपाथवर दुकाने थाटली. पुढे यास विरोध झाल्याने २००१ ते २००७ या दरम्यान दुकाने औरंगपुरा भाजीमंडईत मनपाच्या जागी हलवण्यात आले. त्यानंतर पुन्हा येथून ही दुकाने कर्णपुरा मैदानात लावण्यात आले. एका वर्षानंतर म्हणजे २००९ पासून ते आतापर्यंत हे मार्केट मध्यवर्ती बसस्थानकाजवळील औरंगाबाद टेक्स्टाईल मिलच्या जागेवर भरविल्या जात आहे.

फुटपाथच्या दुकानाचा परिणाम!

तिबेटियन मार्केटच्या बाहेरील फुटपाथवर काही अनधिकृत दुकाने थाटली गेली आहेत. हे दुकानदार कुठल्याही भावात स्वेटरची विक्री करतात, त्यामुळेही तिबेटियन विक्रेत्यांच्या दुकानावर परिणाम झाला आहे.

वातावरणात बदल झाल्याने मधल्या काळात थंडी गायब होऊन उन्हाळ्यासारखे वातावरण झाले होते. त्यामुळे दुकाने बंद करावी लागली. आतापर्यंतचा सर्वाधिक तोटा यावेळेस झाला आहे. गेल्या वर्षी हीच परिस्थिती होती आणि आता त्याहूनही बिकट आहे.

- एस. डी. चौबेल,

अध्यक्ष, तिबेटियन स्वेटर विक्रेता असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी वंशांच्या क्रिकेटपटूला T20 World Cup साठी भारताने व्हिसा नाकारला; सोशल मीडियावर लिहितो की...

Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर: दहशतवादी संबंधांच्या आरोपाखाली 5 सरकारी कर्मचारी निलंबित

Pandharpur Politics : 'आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडले'; पराभूत महिला उमेदवाराच्या पतीचा गंभीर आरोप, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shiv Thakare: अखेर त्या अफवा खोट्या ठरल्या; शिव ठाकरेने सांगितलं 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

SCROLL FOR NEXT