ST bus sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : क्यूआर कोडवर घ्या एसटीचेही तिकीट

महामंडळाने वाहकांना नुकतेच नवीन ॲन्ड्रॉईड तिकीट मशीन उपलब्ध करुन दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एस.टी. बसमधून प्रवास करताना प्रवासी आणि वाहकांचे सुट्या पैशांवरुन होणारे वाद काही नवीन नाहीत. मात्र, आता असे होणारे वाद, तिकिटाच्या पाठीमागे राहिलेले पैसे लिहून देण्याचे प्रकार कमी होणार आहेत.

क्यूआर कोड स्कॅन करुन प्रवासी तिकिटाचे पैसे देऊ शकतील. महामंडळाने वाहकांना नुकतेच नवीन ॲन्ड्रॉईड तिकीट मशीन उपलब्ध करुन दिले आहेत. यावर ‘यूपीआय’द्वारे ‘क्यूआर कोड’ची सुविधा सुरू केली जाणार आहे.

महामंडळाने नुकतेच वाहकांना ॲन्ड्रॉईड तिकीट मशीन दिले असून ते हाताळण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा वाहक वापर करत आहेत. मात्र, ‘यूपीआय’द्वारे ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून तिकीटांचे पैसे घेण्याची सोय नव्हती.

आता ती सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने प्रवासी आणि वाहक दोघांची सोय होणार आहे. पहिल्या टप्प्यात फोन पे आणि क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा स्वीकार करून लवकरच डेबीट कार्ड आणि क्रेडीट कार्डचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती एस.टी. महामंडळ प्रशासनाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

Maratha Reservation: मृत आंदोलकांच्या वारसांना मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनाची पूर्तता; एमआयडीसीत नोकरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश

देशातील ३२ हजार टन सोन्यावर मोदी सरकारची नजर; १ टक्के जरी बाजारात आलं तरी टेन्शन मिटणार, नेमकी काय आहे योजना?

सासर असावं तर असं! सुनेची मालिका पाहण्यासाठी लावली थेट मोठी स्क्रीन, प्राजक्ता गायकवाड पोस्ट करत म्हणाली...

Mumbai News: मुंबईच्या जमिनीत पाणी जिरवण्याची क्षमता शून्य! रस्ते काँक्रीटीकरणाचा दुष्परिणाम, तीन दशकांत ६० टक्के जमीन सिमेंटखाली

SCROLL FOR NEXT