खरीप पिकांचे नुकसान sakal
छत्रपती संभाजीनगर

पाच जिल्ह्यांत खरिपाच्या पिकांचे सर्वाधिक नुकसान

विभागीय आयुक्तांचे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड आणि लातूर या पाच जिल्ह्यांत खरिपाच्या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याशिवाय वाहून गेलेल्या पाच नागरिकांचा मृत्यू झाला. विविध ठिकाणी पाच घरांची पडझड झाली असून ३५ जनावरे मरण पावली आहेत. विभागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मराठवाड्यात दोन आठवडे दडी मारून असलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. सोमवारी दिवसभर मध्यम स्वरूपाची हजेरी लावल्यानंतर मध्यरात्रीपासून जोर वाढला. त्यामुळे बीड, नांदेड, औरंगाबाद आणि जालन्यातील काही मंडळांत ढगफुटीसदृश पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नदी, पाझर तलाव आणि बंधाऱ्यांलगत असलेल्या शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी देखील विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० या २४ तासांत विभागात पुरामध्ये वाहून गेल्याने ३५ जनावरे मरण पावली आहेत. यात औरंगाबादेत लहान-मोठी १९, जालन्यात २, नांदेडमध्ये १४ अशा जनावरांचा समावेश आहे. ढगफुटीसदृश पावसामुळे जालन्यातील अंबडमध्ये एका घराची पडझड झाली आहे. दोन पूल वाहून गेले. नांदेडमध्ये एका घराचे अंशत: नुकसान झाले आहे. बीडमध्ये तीन घरांची पडझड झाली आहे. विभागात दोन दिवसांच्या पावसात मका, सोयाबीन, कापूस या पिकांसह फळबागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासंदर्भातील प्राथमिक अंदाज विभागीय आयुक्तालयाच्या वतीने गुरुवारी राज्य शासनाला पाठविला जाणार आहे.

७ मंडळांत अतिवृष्टी-

औरंगाबादेत सिल्लोड ७१ मि.मी., गोलेगाव ११४.७५ मि.मी., जालन्यात भोकरदन ११२ मि.मी., सिंपोरा ७७.५० मि.मी., धावडा ६६.२५ मि.मी., आन्वा १४१.७५ मि.मी., जाफ्राबाद ८५ मि.मी. पाऊस झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! विदर्भ वगळता सर्वत्र पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

IND A vs SL A: भारतीय अ संघ Tri-Series चा विजेता! वैभव सूर्यवंशीच्या वादळानंतर गोलंदाजांचा अचूक मारा, फायनलमध्ये श्रीलंका पराभूत

Krishna River Crisis: कृष्णा नदीचे दूषित पाणी आणि पाणी उपसा बंदीमुळे कोपर्डे हवेलीतील शेतकरी‑ग्रामस्थांवर दुहेरी संकट

Factory Gas Leak: फूड फॅक्टरीत अमोनिया गॅस गळतीचा भीषण कहर! ७ महिला कामगारांचा मृत्यू, ६७ लोकांची प्रकृती गंभीर, चौकशीचे आदेश

Latest Marathi News Live Update : उमरगा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमक

SCROLL FOR NEXT