sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : मंगळसूत्र चोराला ठोकल्या बेड्या

सोनसाखळीसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गजानन चौकात रिक्षातून उतरून विजयनगरकडे पायी जात असलेल्या महिलेचे १० ग्रॅमचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे गंठण दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी हिसकावल्याची घटना शनिवारी (ता.२) दुपारी दीडच्या सुमारास घडली होती. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी रेकॉर्डवरील एका मंगळसूत्रचोराला अटक केली, तर एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले.

या दोघांच्या ताब्यातून चोरलेली सोनसाखळी, गुन्हा दाखल करताना वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विजयनगर येथील दुर्गा मेने (वय ४०) शनिवारी दुपारी बाळाला डोस पाजण्यासाठी मुलीसह एमजीएम हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या.

त्या दोघी पायी विजयनगरकडे जात असताना मल्हार चौकात पाठीमागून येणाऱ्या एका तरुणाने त्यांचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावले. दरम्यान, तपासासाठी उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुजेट तपासत व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून हा गुन्हा रेकॉडवरील गुन्हेगार अक्षय उर्फ भैय्या रमेश वाहुळ (वय.२३, रा. बावनघर, एकतानगर, सातारा परिसर) याने दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसोबत केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अक्षयचा कसोशीने शोध घेऊन जेरबंद केले. दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसोबत गुन्हा केल्याची कबुली अक्षयने दिली.

तसेच ४ डिसेंबरला बीड बायपास भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्रही चोरल्याची कबुली दिली. याबाबत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कामगिरी पोलिस निरीक्षक राजेश यादव, उपनिरीक्षक कल्याण शेळके, पोलिस नाईक गणेश डोईफोडे, पोलिस अंमलदार कल्याण निकम, अमोल आहेर, प्रशांत नरोडे, दीपक जाधव, संदीप बीडकर, विक्रम खंडागळे, योगेश चव्हाण यांनी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

सुपरस्टार अभिनेता Vijay Deverakonda च्या कारचा भीषण अपघात! नेमकं काय घडलं? पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Georai Nagarparishad Election : बीडमधील गेवराईचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; गीता पवार, शितल दाभाडे दावेदार

Raju Shetty : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटामारी मान्य केली; मग कारवाई का नाही

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT