nabard sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : नाबार्डने दिलेल्या मोबाइल एटीएम व्हॅन उभ्याच

जिल्हा बँकेची उदासीनता : दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याचे कारण

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात बँकिंग सेवा देणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्‍ट्र ग्रामीण बँकेला मदतीसाठी राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) दोन मोबाइल एटीएम व्हॅन (फिरते एटीएम वाहन) दिल्या आहेत. यात ग्रामीण बँकेतर्फे या वाहनाचा प्रभावीपणे वापर होत आहे. तर वाहनाचा देखभाल, दुरुस्तीसह त्याला मिळणारा प्रतिसाद अत्यल्प असल्याचे कारण देत जिल्हा बँकेने हे एटीएम व्हॅन फिरविणेच बंद केले आहे.

ग्रामीण भागासह दुर्गम भागातील लोकांना पैशाचा व्यवहार करता यावा, यासाठी हे फिरते एटीएम सुरू करण्यात आले. आठवडी बाजार यासह गर्दीच्या ठिकाणी हे एटीएम मोबाइल व्हॅन पाठवण्यात येत होती. सुरवातीला ही व्हॅन जिल्हा बँकेतर्फे जिल्ह्यातील मोठ्या बाजार गावात फिरविण्यात येत होते. मात्र, एटीएमवर व्यवहार कमी झाला. ऑनलाइन, यूपीआयवरून व्यवहार वाढल्यामुळे रोखीने व्यवहार कमी झाले आहे.

यामुळेच या फिरत्या एटीएमचा देखभाल, दुरुस्तीचा खर्चही खर्चही निघत नसल्याचे कारण जिल्हा बँकेने दिले आहे. यामुळे गेल्या काही आठवड्यापासून हे एटीएम वाहन जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर उभे करण्यात आले आहे. याच ठिकाणी एटीएमची सुविधा ते देत आहे. शहरात प्रत्येक अर्धा किलोमीटरवर राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम आहे. हे असताना या एटीएमचा वापर येथेही होताना दिसत नाही. यामुळे नाबार्डने सर्वसामान्य, शेतकरी यांच्यासाठी दिलेल्या या सुविधाचा वापरच होताना दिसत नाही.

ग्रामीण भागात बँक मित्राला प्रतिसाद

ग्रामीण भागात बँकेतून पैसे काढण्यासाठी अजूनही सक्षम अशी प्रणाली नाही. ही गोष्ट ओळखून काही खासगी कंपन्यांनी त्यांचे एटीएम ग्रामीण भागात सुर केले आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. त्या खासगी एटीएमच्या तुलनेत हे मोबाइल एटीएमची सुविधा प्रभावी सुलभ आणि सोपी आहे. असे असतानाही त्याचा वापर होत नाही. बँकाही त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात कमी पडली आहे. या एटीएम व्हॅनचीही असाच प्रभावीपणे वापर केल्यास एटीएमवर दिवसाकाठी मोठ्या प्रमाणावर व्यवहार होईल. त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे असल्याचे मतही तज्ज्ञातर्फे व्यक्त करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात बँकिंग सेवा देणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला प्रत्येक एक मोबाईल एटीएम व्हॅन दिली आहे. त्या वाहनाची देखभाल दुरुस्ती नाबार्डने केली. हे वाहन फिरवत सेवा देणे गरजेचे आहे. त्या बँकांच्या काही अडचणी असेल तर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू.

— सुरेश पट्टेवार, जिल्हा विकास प्रबंधक, नाबार्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT