sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : ‘स्मार्ट’ रस्ते गुणवत्तेत नापास!

नागरिकांच्या वाढत्या तक्रारी मुंबई आयआयटी पथकाच्या तपासणीनंतरच महापालिका प्रशासन घेणार ताबा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीच्या ३१७ कोटींच्या निधीतून शहरात १०८ रस्त्यांची कामे केली जात आहेत. स्मार्ट सिटीमार्फत स्मार्ट कामे होणे अपेक्षित असताना कामांच्या दर्जाबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. जवाहर कॉलनीतील रस्ता फोडून नव्याने करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. त्यानंतर इतर रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. म्हणजे, स्मार्ट रस्ते गुणवत्तेत नापास झाल्याची स्थिती शहरात आहे. आतापर्यंत २२ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर ४४ रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र, यातील एकही रस्ता ताब्यात घेण्यात आलेला नाही. मुंबई आयआयटीच्या पथकाने पाहणी करून ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर हे रस्ते ताब्यात घेतले जाणार आहेत.

शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे शासन व महापालिकेच्या निधीतून झालेली आहेत. असे असले तरी अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे महापालिकेने राज्य शासनाकडे रस्त्यांचा प्रस्ताव पाठविला होता. पण, शासनाकडून निधी न मिळाल्याने ही कामे स्मार्ट सिटीकडे वर्ग करण्यात आली. ए. जे. कन्स्ट्रक्शन या एकाच कंत्राटदाराला निविदा देण्यात आली आहे. १०८ रस्त्यांसाठी ३१७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते; पण २६४ कोटीत म्हणजेच ४० टक्के कमी रकमेत कंत्राटदाराने काम घेतले. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर सुरवातीपासूनच शंका उपस्थित केली होती.

या रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी स्मार्ट सिटीने मुंबई आयआटीची नियुक्ती केली आहे. मुंबई आयआयटीच्या पथकाने सुरवातीला शहरात येत रस्त्यांचे सर्वेक्षण करून कामे कशी करायची याविषयी सूचना केली. मात्र, प्रत्यक्षात काम झाल्यानंतर त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर हे पथक शहरात आलेच नाही. आता जानेवारी महिन्यात हे पथक शहरात येणार असून, झालेल्या कामाची पाहणी केली जाणार आहे. यापूर्वी रोपळेकर हॉस्पिटल चौक ते जवाहरनगर पोलिस ठाणे हा रस्ता निकृष्ट झाल्याने तो जागोजागी फोडून नव्याने करण्यात आला. त्यानंतर निकृष्ट कामाबाबत तक्रारी सुरूच आहेत.

असे आहेत आक्षेप

  • दमडीमहल ते जालना रोड या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

  • सौभाग्य चौक ते नवजीवन कॉलनी रस्त्यांचा ४५ फुटांचा आहे, तो किमान ३० फूट रुंदीचा होईल,

  • अशी अपेक्षा होती, पण १७ फुटांपर्यंत काम करण्यात आले.

  • अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा अद्याप पेव्हर ब्लॉक टाकण्यात आलेले नाहीत.

  • काही ठिकाणी विजेचे खांब न हटविताच रस्त्यांची कामे केली आहेत.

  • कटकट गेटमधून चंपाचौककडे येणाऱ्या रस्त्यात सरफेस योग्य नाही, रस्त्यांचे काम अर्धवट आहे

रस्त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी मुंबई आयआयटीसोबत बोलणी झाली आहे. पथक जानेवारी महिन्यात शहरात येणार आहे. रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची १० वर्षांपर्यंतची जबाबदारी कंत्राटदाराकडेच आहे. त्रुटी निघाल्यास कंत्राटदारालाच खर्च करून रस्ता दुरुस्त करावा लागणार आहे.

- इम्रान खान, प्रकल्प व्यवस्थापक, स्मार्ट सिटी.

रोपळेकर हॉस्पिटल चौक ते जवाहरनगर पोलिस ठाणे या निकृष्ट रस्त्याची फक्त डागडुजी करण्यात आली आहे. अद्यापही ५० टक्के रस्ता खराब आहे. वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन दखल घेण्यास तयार नाही.

- सुरेंद्र कुलकर्णी, माजी नगरसेवक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ghaywal Mulshi Pattern : कुख्यात गुंड सचिन घायवळने 'मुळशी पॅटर्न'मध्ये केलंय काम, प्रवीण तरडेंचं काय होतं स्पष्टीकरण?

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या बूथ यंत्रणा मजबूत करण्याच्या सूचना

Lakshami Pujan 2025 Date: यंदा लक्ष्मीपूजन महाराष्ट्रात, भारतात अन् जगभरात नक्की कोणत्या तारखेला करायचं? वाचा एका क्लिकवर

Nagpur Municipal Election 2025: निवडणुकीसाठी आयोगाची यादी धरणार ग्राह्य; ३१ जुलै २०२५ पर्यंतची राहणार मतदार यादी

Mhada Lottery: ५ वर्षांत ३५ लाख घरे, मुंबईत मिळणार परवडणारी घरे; एकनाथ शिंदे यांची घोषणा

SCROLL FOR NEXT