sambhaji nagar  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : महापालिकेपुढे ३० टक्के स्वहिश्श्याचा पेच

तिजोरीतील खडखडाटामुळे शासन योजना अडचणीत

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजनेअंतर्गत कोट्यवधींचा निधी दिला असला तरी त्यात स्वहिस्सा म्हणून निधी टाकताना महापालिकेला मोठी कसरत करवी लागत आहे. पाणीपुरवठा योजना, सातारा-देवळाई ड्रेनेजलाइन यासह विविध कामांत महापालिकेला तब्बल एक हजार कोटी रुपयांचा निधी टाकावा लागणार आहे तर दुसरीकडे तिजोरीत खडखडाट आहे. स्वहिस्सा भरला नाही तर या योजना मार्गी कशा लागतील, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

केंद्र व राज्य शासनाने महापालिकेला गेल्या काही वर्षांत विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात अमृत-२ मधील २७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना, सातारा-देवळाईसाठी ड्रेनेजलाइन, कमल तलावाचे सौंदर्यीकरण यासह इतर प्रकल्पांचा समावेश आहे. यातील पाणीपुरवठा योजनेचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. केंद्र आणि राज्य शासन मिळून या योजनेसाठी ७० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. महापालिकेला स्व:हिस्सा म्हणून ८५५ कोटी रुपये भरावे लागणार आहेत.

न्यायालयाने हा निधी राज्य शासनाने द्यावा, असे आदेश दिले आहेत. पण, अद्याप राज्य शासनाने यासंदर्भात आदेश काढलेले नाहीत. सातारा देवळाईच्या ड्रेनेज प्रकल्पासाठी महापालिकेला ८० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. कमल तलावाच्या सौंदर्यीकरण व सुशोभीकरणाच्या कामात ९० लाख रुपये भरावे लागणार आहेत; तसेच पडेगाव-मिटमिटासह नो-नेटवर्क भागासाठी १९० कोटीचा ड्रेनेज प्रकल्प सध्या मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. हा प्रकल्प मंजूर झाल्यास ६३ कोटींचा निधी द्यावा लागणार आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्या टप्प्यात ७२ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यातून सध्या पडून असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेला २४ कोटींच्या निधीची तरतूद करावी लागणार आहे. ही एकूण रक्कम सुमारे एक हजार कोटींच्या घरात आहे. महापालिकेने हा निधी दिला नाही, तर योजना संकटात सापडण्याची शक्यता आहे.

स्मार्ट सिटीसाठी काढले कर्ज

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत केंद्र शासनाचा ५०० कोटी व महापालिका राज्य शासनाचा प्रत्येकी २५० कोटींचा वाटा होता. महापालिकेला २५० कोटी भरण्यास विलंब झाल्याने केंद्र शासनाने निधी रोखून धरला होता. त्यानंतर कर्ज काढून २५० कोटी रुपये भरण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Christmas: चक्कर येऊन पडला सांताक्लॉज..., 'आप'च्या तीन बड्या नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल; चेष्टा करणं पडलं महागात

Bangladesh Mob kills young Hindu: संतापजनक! बांगलादेशात जमावाने आणखी एका हिंदू तरुणाचा बेदम मारहाण करून घेतला जीव

Crime: गुन्ह्यांचं शतक करायचं होतं, पण ५०० रुपयांच्या नोटेनं खेळ बिघडवला, तरुणाला तुरुंगवास घडवला, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : एमजीएमच्या मैदानावर रंगणार नऊ दिवस सामने

SCROLL FOR NEXT