PAT Exam
PAT Exam sakal
छत्रपती संभाजीनगर

PAT Exam : मूल्यांकन चाचणीच्या वेळापत्रकात बदल ; राज्यभरात चार ते सहा एप्रिलदरम्यान होणार ‘पॅट’ चाचणी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शासनामार्फत राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट) ता. २ ते ४ एप्रिलदरम्यान घेण्यात येणार आहे. त्याचदरम्यान दोन एप्रिलरोजी जिल्ह्यात नाथषष्ठीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाने सुटी जाहीर केलेली आहे. त्यामुळे दोन तारखेला मुलांनी परीक्षा घ्यावी की, सुटी? याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परीक्षेचे वेळापत्रक बदलून आता ४ ते ६ एप्रिलदरम्यान परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (एकूण १० माध्यमे) करिता तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यापैकी पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन एक घेण्यात आलेली आहे.

तर दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी ता. २ ते ४ एप्रिलदरम्यान राज्यभरातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी घेण्यात येणार होती; परंतु दोन एप्रिलरोजी नाथषष्ठी असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विभागीय आयुक्त कार्यायाने सुटी जाहीर केली आहे. तसेच त्याच दिवशी म्हणजे दोन एप्रिलला तिसरी ते सहावीसाठी ११ ते १२.३० वाजता; तर सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ११ ते १ यावेळेत प्रथम भाषेचा पेपर घेण्यात येणार होता. त्यामुळे दोन एप्रिलला परीक्षा घ्यायची की नाथषष्ठीनिमित्त मुलांना सुटी द्यायची? असा प्रश्न शाळांकडून विचारला जात होता. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. तसेच दोन तारखेचा पेपर पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणीही शाळांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून केली होती. या वृत्ताची दखल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेऊन २ ते ४ ऐवजी ४ ते ६ एप्रिलदरम्यान परीक्षा घेण्याच्या सूचना सर्व शाळांना दिल्या आहेत.

उन्हाळ्यामुळे परीक्षेच्या तारखेसह वेळेतही बदल

जुन्या वेळापत्रकानुसार चाचणी परीक्षेची वेळही दुपारी एक वाजेपर्यंत होती. मात्र, आता तारखेत बदल करण्यात आला असून चाचणी परीक्षाही सकाळी आठ ते १० दरम्यान घेण्यात येणार आहे.

नवीन वेळापत्रकानुसार

ता.४ एप्रिल : प्रथम भाषा

(सर्व माध्यमे)

तिसरी व चौथी : सकाळी ८ ते ९.३० पाचवी व सहावीची ८ ते ९.४५

सातवी व आठवीची ८ ते १०

ता. ५ एप्रिल : गणित (सर्व माध्यमे)तिसरी व चौथी ः सकाळी ८ ते ९.३० पाचवी व सहावीची ८ ते ९.४५

सातवी व आठवीची ८ ते १०

ता. ६ एप्रिल : इंग्रजी

तिसरी व चौथी : सकाळी ८ ते ९.३०

पाचवी व सहावीची ८ ते ९.४५

सातवी व आठवीची ८ ते १०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एमआयडीसी मध्ये जागा बघितली होती पण... दाभोलकर खुनाप्रकरणी जन्मठेप झालेल्या शरदच्या घरी शोकाकुल वातावरण

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना दिलासा! ऐन निवडणुकीत न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन

Latest Marathi News Live Update : PM मोदी आणि अमित शाह मतदानाच्या तीन टप्प्यांनंतर घाबरले; मल्लिकार्जुन खर्गे यांची भाजपवर टीका

Hardik Pandya: हार्दिकला कसा मिळाला BCCI चा 'अ' श्रेणीचा करार? जय शाहांनी सांगितलं काय होती अट..

Narendra Dabholkar Case Live Updates: आज दाभोळकर प्रकरणी जो निर्णय दिला, त्याबद्दल आम्ही आभार मानतो - सनातन संस्था

SCROLL FOR NEXT