sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : कामगाराला लुटणारे दोघे २४ तासांत गजाआड ; गंगापूर पोलिसांची कारवाई ,दुसऱ्या घटनेत दुचाकी चोरट्यालाही पकडले

भिवधानोरा (ता.गंगापूर) येथील शेतवस्तीवर परप्रांतिय कामगाराला चाकुचा धाक दाखवून दोघांनी लुटल्याची घटना गुरुवारी (ता.१८) घडली होती. गंगापूर पोलिसांनी कारवाई करीत दोन आरोपींना चोवीस तासात शिताफीने अटक केले तर दुसऱ्या घटनेत मोटरसायकल चोरट्यास पाठलाग करून जेरबंद केले.

सकाळ वृत्तसेवा

कायगाव : भिवधानोरा (ता.गंगापूर) येथील शेतवस्तीवर परप्रांतिय कामगाराला चाकुचा धाक दाखवून दोघांनी लुटल्याची घटना गुरुवारी (ता.१८) घडली होती. गंगापूर पोलिसांनी कारवाई करीत दोन आरोपींना चोवीस तासात शिताफीने अटक केले तर दुसऱ्या घटनेत मोटरसायकल चोरट्यास पाठलाग करून जेरबंद केले. सागर अशोक जाधव (रा.पाखोरा ता.गंगापूर), रामेश्वर बाळासाहेब चव्हाण (रा. भिवधानोरा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे.

गंगापूर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार दिनेश कश्यप (वय ३४,रा.पिपलीया गई, ता.सेंधवा जि. बडवाणी (मध्यप्रदेश) ह.मु. भिवधानोरा ता.गंगापूर) यांनी गुरूवारी (ता.१८) फिर्याद दिली की, भिवधानोरा आठवडा बाजार असल्याने सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास बाजार करण्यासाठी गेलो होतो.

रात्री ८ वाजेच्या सुमारास शेतवस्तीवर परत जाताना भिवधानोरा गावाच्या अलिकडे दोघांनी चाकुचा धाक दाखवून १५ हजार रूपये व मोबाईल फोन असा एकुण २६ हजाराचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. यावरून गंगापूर ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, निरीक्षत ताईतवाले यांच्या पथकाने पखोरा येथील शेतवस्तीवर सागर जाधव यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने रामेश्वर चव्हाण सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. येथील स्मशानभूमी परिसरातून रामेश्वरलाही ताब्यात घेतले.

मोटरसायकल जप्‍त

पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले हे पखोरा येथील आरोपीला घेऊन जात होते. यावेळी दुचाकीवर एकजण सुसाट जात असल्याने त्यासा करून थांबविले. त्याला विचारपुस केली असता दुचाकी

(क्र. एमएच-२० डीपी-७४०४) चोरी केल्याची कबुली दिली. सुरेश घाणे (रा. शहापूर-घोडेगाव) असे या तरुणाचे नाव आहे. कारवाई निरीक्षक ताईतवाले, उपनिरीक्षक प्रमोद काळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, राहुल वडमारे, संदीप गायकवाड, अजित नागलोद यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT