theft case in parundi one lakh rs stolen from house robbery police crime  SAkal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : घराचे कुलुप तोडुन धाडसी चोरी; पारुंडी येथील घटना, एक लाखाचा ऐवज लंपास

गावातील लोक कुठे जात आहे घरात कोणी आहे कि नाही यावर पाळंत ठेवुन अशा घटना घडत असुन ब्राम्हणगाव येथील मालक घरी नसल्याने अशीच चोरी करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

आडुळ : शेतातील मोसंबी झाडाला राञी पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकरयाच्या घरातील रोख रक्कम ५० हजार व सोन्याचे दागीने असा अंदाजे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना पारुंडी ता. पैठण येथे शनिवारी (ता.९) रोजी मध्यराञीच्या सुमारास घडली.

मेहताब बाप्पु शेख राहणार पारुंडी हे शेतकरी शनिवारी राञी घराला कुलुप लावुन शेतात असलेल्या मोसंबी बागेला पाणी भरण्यासाठी गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यराञीच्या सुमारास त्यांच्या घरा शेजारी राहणारयांच्या घरांचे बाहेरुन कळी कोयंडा लावला व महेताब शेख यांच्या घराला असलेले कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन घरात असलेली पेटी घेवुन पोबारा केला.

चोरट्या सदरील पेटी लांब जंगलात जावुन फोडली व त्यात असलेली रोख रक्कम व दागिने घेवुन पसार झाले. सकाळी शेतकरी महेताब शेख हे घरी परत आल्यावर त्यांना दार उघडे दिसल्याने त्यांनी घरात बघितल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याची माहिती पाचोड पोलीसांना कळविण्यात आली आहे.

गावातील लोक कुठे जात आहे घरात कोणी आहे कि नाही यावर पाळंत ठेवुन अशा घटना घडत असुन ब्राम्हणगाव येथील एक चालक घरी नसल्याने अशीच चोरी करण्यात आली होती तर गेवराई मर्दा व आडुळ येथे ही अशी घटना घडली आहे त्यामुळे पोलीसांनी सदरील चोरींच्या घटनांचा कसुन तपास करुन आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी आडुळ सह परिसरातुन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT