पाकीट मार  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : राज ठाकरेंच्या सभेत हातसफाई

पाकीट मारल्यानंतर वाटणीवरून चाकुहल्ला

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - राज ठाकरे यांच्या सभेत गर्दीचा फायदा घेत तेथील नागरिकांचे पाकिट मारुन आलेल्या पैशांच्‍या वाटणीवरुन दोघांनी १४ वर्षीय साथीदाराच्‍या पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केले. ही घटना १ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्‍या सुमारास बुढीलेन परिसरा घडला. या प्रकरणात सिटीचौक पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्‍यांना सहा मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी सोमवारी (ता. दोन) दिले. जुबेर खान जफर खान (२१) आणि अकबर खान रऊफ खान (४६, दोघे रा. बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात इमरान खान आरेफ खान (वय २२, रा. अन्‍सार कॉलनी, ह. मु भडकल गेट) याने फिर्याद दिली. त्‍यानूसार, जखमी सुलतान इशा शेख हा फिर्यादीच्‍या मोठ्या भावाचा साला आहे. तर आरोपी जुबेर खान आणि अकबर खान हे दोघे फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत.

फिर्यादी, फिर्यादीचा भाऊजी, जखमी सुलतान व त्‍याची आई असे सर्व जण भीक मागून उदनिर्वाह चालवितात. १ मे रोजी सायंकाळी फिर्यादी व सुलतान हे दोघे भडकल गेट परिसरात भिक मागत होते. त्‍यावेळी अकबर खान, जुबेर खान हे समीर पठाण याच्‍या रिक्षातून सभेच्‍या ठिकाणी गेले. तेथे त्‍यांनी काही व्‍यक्तींची पाकिटे मारली. व आलेल्या पैशातून त्‍यांनी बुढीलेन येथील हॉटेलात जेवण केले. त्यानंतर झालेल्या वादानंतर जुबेरने चाकू काढून सुलतानच्‍या पोटात खुपसला. उपस्थित नागरिकांनी दोघा आरोपींना पकडून पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले. प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील आमेर काजी यांनी युक्तीवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT