There is an increased trend towards ova cultivation In Aurangabad district
There is an increased trend towards ova cultivation In Aurangabad district 
छत्रपती संभाजीनगर

जिल्ह्यात वाढला ओवा लागवडीकडे कल

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - मसाल्यात वापर आणि औषधी गुणधर्मामुळे ओव्याला कायमच मोठी मागणी आहे. कोरडवाहू जमिनीतही एकरी ३ ते ४ क्विंटल उत्पादन आणि चांगला भाव मिळवून देणारे पीक म्हणून ओव्याकडे पाहिले जात आहे. गेल्यावर्षी सुमारे ५५० एकरांत ओव्याची लागवड करण्यात आली होती. चांगल्या उत्पन्नामुळे ओव्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून यंदा यात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मसाले आणि आयुर्वेदिक औषधांमधील वापरासाठी ओव्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने बांधावरच्या ओव्याची शेतीमध्ये लागवड सुरू झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राकडून २०१४ पासून या पिकाची शेतकऱ्यांमध्ये जागृती सुरू केली. सुधारित तंत्रज्ञान आणि क्षेत्रविस्तारांतर्गत या पिकाविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षणापासून ते काढणीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन केले जात आहे.

हवामान बदलावर आधारित राष्ट्रीय कृषी प्रकल्पांतर्गत पीक बदल म्हणून मरावाड्यात पहिल्यांदा येथील कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेऊन ओवा लागवड प्रकल्प राबवला आहे. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी सांगितले, गेल्या वर्षी सुमारे साडेपाचशे एकरांत औरंगाबाद जिल्ह्यात ओवा पिकाची लागवड करण्यात आली होती. १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट हा ओवा लागवडीचा काळ असून यावर्षी या क्षेत्रात आणखी वाढ होईल. कारण हे पीक फेरपालट म्हणूनही महत्त्वाचे आहे आणि कपाशीच्या तुलनेत यात चांगले उत्पन्न मिळू शकते. ओव्याला जगभरातून मागणी आहे. ओवा मसाला पीक आहे, याचा सर्व मसाल्यात वापर केला जातो. यातल्या औषधी गुणधर्मामुळे आयुर्वेदिक औषधींमध्ये, घरगुती वापर, बेकरी उत्पादने आणि बऱ्याच वाइनरीजमध्ये फ्लेवरसाठी याचा वापर होतो.

लागवड खर्च कमी, उत्पन्न अधिक

डॉ. झाडे म्हणाले, की कोरडवाहू जमिनीत एकरी सरासरी ३ ते ४ क्विंटल तर संरक्षित सिंचनाची सोय असेल एक दोन पाणी दिले तर एकरी ७ ते ८ क्विंटल उत्पादन होते. तर लागवड खर्च एकरी ६ ते ७ हजार रुपये इतका येतो. प्रतिक्विंटल सरासरी १० हजार रुपये भाव मिळतो. कोरडवाहू शेतीतील तीन क्विंटल उत्पादन गृहीत धरले तरी एकरी ३० हजार रुपये उत्पन्न आणि त्यातील एकरी ७ हजार लागवड खर्च वजा करता २३ हजार निव्वळ नफा मिळू शकतो असा दावा केला. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर या अवर्षणप्रवण भागासाठी तर ओवा पीक खूप फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी किमान दहा, वीस गुंठे तरी याची लागवड करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT