police Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादच्या शिवना येथे चोरट्यांचा ऊच्छाद

श्री. शिवाई देवीचे दागीने पळविले

सुभाष होळकर

शिवना (जि. औरंगाबाद) - बाहेरगावी गेलेल्या शिवना (ता. सिल्लोड) येथिल वैद्यकीय व्यावसायिकाचे घर फोडून सुमारे तीन लाखाचे दागिने व रोख रक्कम लांबविन्याच्या घटनेस रात्र उलटत नाही तोच, सोमवारी (ता. तीस) भर दुपारी शिवना येथील ग्रामदैवत श्री. शिवाई देवी मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवीच्या अंगावरील सोन्याची नथ व सोन्याचे मंगळसूत्र पळवून चक्क पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

शिवना येथील प्रथितयश डॉक्टर सतिशकुमार माणकलाल अग्रवाल (वय ६८) हे कुटुंबासह शनिवारी (ता.२८) पासून बाहेरगावी गेलेले होते. नेमकी हीच संधी साधत चोरट्यानी त्यांच्या अजिंठा- बुलडाणा राज्य मार्गावरील मुख्य बाजारपेठेतल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील दरवाजाची कडी कोयंडा तोडून कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम मिळून तब्बल २ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी (ता. २९) च्या रात्री घडली.

ग्राम देवतेचेही दागीने पळविले

दरम्यान, सोमवारी दुपारी रणरणत्या उन्हात मंदिरात शुकशुकाट असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी येथील ग्रामदैवत श्री. शिवाई देवी मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून एक सोन्याची नथ व मंगळसूत्र असा अंदाजे छत्तीस हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. मंदिर विश्वस्त समितीने पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव, सहायक पोलिस निरीक्षक अजित विसपुते यांनी घटना स्थळी भेट दिली. पुढील तपास बीट जमादार अरुण गाडेकर, गोपनीय शाखेचे विकास लोखंडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Womens T20 WorldCup: २४ चेंडूत वादळ, दक्षिण आफ्रिकेचा केला धुव्वा! महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची दणदणीत सुरुवात

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आश्वासक नायक; 'दादा, एक गुड न्यूज आहे' फेम ऋषी मनोहरचा नवा धमाका! १९ जूनला काय होणार खास?

दोर बांधायला विसरले, बंजी जंपिंगवेळी निष्काळजीपणा; २१ वर्षीय तरुणीला तशीच फेकली, जागीच मृत्यू

Mumbai News: मुंबईतील स्मशानभूमी होणार प्रदूषणमुक्त, 'कार्बनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली' बसवणार

Latest Live Updates Marathi: लातूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT