1crime_33 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत कंत्राटदाराचे घर फोडून चोरांनी बारा तोळे सोने, २५ हजार रुपये चोरले

मनोज साखरे

औरंगाबाद : हर्सूल परिसरातील कंत्राटदाराचे घर फोडून चोरांनी बारा तोळे सोने व २५ हजार रुपये लंपास केले. हि घटना सोमवारी (ता. १४) सकाळी आठच्या सुमारास राजे संभाजी कॉलनीत उघडकीस आली़. चोरांनी गॅलरीमधील सीसीटीव्ही कॅमेरा फिरवून डीव्हीआरही चोरुन नेला. पोलिसांकडून प्रप्त माहितीनुसार, इलेक्ट्रिक कंत्राटदार असलेले संतोष लक्ष्मण जाधव (रा. राजे संभाजी कॉलनी, छत्रपती हॉलमागे) रविवारी सकाळी कुटुंबासह त्यांचे मुळगाव सांजोळ (ता. फुलंब्री) येथे कामानिमित्त गेले होते.

सोमवारी सकाळी शेजाऱ्याने त्यांना मोबाईलवर संपर्क साधून घराचा दरवाजा उघडा दिसत असल्याचे सांगितले. हि माहिती समजताच संतोष जाधव यानी घराकडे धाव घेतली. त्यावेळी बेडरुममधील कपाट फोडून चोरांनी त्यातील साहित्य बाहेर फेकल्याचे दिसून आले. कपाट उघडून पाहिले असता त्यातील बारा तोळ्याचे सोन्याचे दागिने व २५ हजारांची रोख चोरीला गेल्याचे समोर आले. गॅलरीमधील सीसीटीव्ही कॅमेराही वरच्या दिशेने फिरवून डिव्हीआर त्यांनी चोरी केल्याचे आढळले. या प्रकारानंतर संतोष जाधव यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तत्पूर्वी घटनेनंतर हर्सूल पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांच्यासह गुन्हे शाखा निरीक्षक अनिल गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. तसेच श्वान पथकानेही माग काढला.
 

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT