Sambhaji Nagar Crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : सिडकोत बंगला फोडून साडेपाच लाख लंपास

सिडको एन-४ परिसरात बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घराला ‘लक्ष्य’ करीत चोरट्यांनी साडेपाच लाखांचा ऐवज चोरून नेला. २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार घडला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-४ परिसरात बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घराला ‘लक्ष्य’ करीत चोरट्यांनी साडेपाच लाखांचा ऐवज चोरून नेला. २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

श्रीनिवास आनंद जोशी (वय २८) यांनी तक्रार दाखल केली. जोशी कुटुंबीय २ फेब्रुवारीला सायंकाळी पुणे येथे गेले होते. ४ फेब्रुवारीला सकाळी त्यांना शेजाऱ्याचा कॉल आला. त्यांनी कळवले, की जोशी यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उघडा आहे.

जोशी यांनी शेजाऱ्यांना घरात जाऊन खात्री करण्यास सांगितले असता त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे त्यांनी जोशी यांना सांगितले. दुपारी जोशी कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला होता.

चोरट्यांनी कानातले, मंगळसूत्र, टॉप्स जोड, तसेच इतर सोन्याचे-हिऱ्याचे दागिने असा ५ लाख ६१ हजारांचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसीपी रणजित पाटील, पोलिस निरीक्षक राजेश यादव, पीएसआय कल्याण शेळके तसेच पथकाने घटनेस्थळी भेट दिली. श्वानपथक तसेच फिंगरप्रिंटस तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने जवळच असलेल्या चौकापर्यंत माग काढला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil Fact Check : 'भाकरी करपली नाहीच' आयपीएस विश्वास नांगरे पाटलांनी कविता लिहली की नाही?, महाराष्ट्र सरकारकडून फॅक्ट चेक

INDIA SQUAD VS AFGHANISTAN: भारताच्या संघात गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन... वन डेत ४, तर कसोटीत ७ खेळाडू

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

SCROLL FOR NEXT