2gram_panchayat_2 
छत्रपती संभाजीनगर

ग्रामपंचायतींना मूळ अनुदानाचे ३९ कोटी वितरित, जिल्हा परिषदेसह पंचायत समितीला दहा टक्के निधी

दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा निधी वितरित न केल्यावरून नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत पदाधिकारी तसेच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हा निधी लवकरच ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची महिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे यांनी सभागृहाला दिली होती. त्यानुसार सोमवारी (ता.२१) १५ व्या वित्त आयोगाच्या मूळ अनुदानाचे (बेसिक ग्रॅन्ट) ३९ कोटी २९ लाख १६ हजार रुपये ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांनी दिली.


पंधराव्या वित्त आयोगाच्या २०२०-२१ मूळ अनुदानाचे ४९.११ कोटी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले होते. प्राप्त निधीतून ८० टक्के निधी (३९ कोटी २९ लाख १६ हजार ) जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना सोमवारी वितरण करण्यात आले. ता.२९ जुन रोजी जिल्हा परिषदेला ४९ कोटी ११ लाख ४६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यातील ८० टक्के निधी हा ग्रामपंचायतींना, तर १० टक्के पंचायत समिती तसेच १० टक्के जिल्हा परिषद स्थरावर खर्चासाठी ठेवण्यात येतो.

कोरोनामुळे मिळणाऱ्या विविध निधींमध्ये ६७ टक्के कपातीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींची विकास कामांची भिस्त याच निधीवर अवलंबून होती. गेल्या दोन महिन्यांत पंचायत व वित्त विभागातील काही अधिकरी आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या कोरोनामुळे निधी वितरणास विलंब झाला होता. मात्र आता निधी वितरित करण्यात आल्याने ग्रामपंचायतींना विकास कामे मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


चार सप्टेंबरला कोषागारातून जिल्हा परिषदेला निधी
ग्रामपंचायतीना १५ व्या वित्त आयोगातून निधी देण्याविषयी शासन निर्णय पारित करण्यात आला होता, तर ता.४ सप्टेंबर रोजी सदर शीर्षकाखालील निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला होता. परंतु माझा आणि निधी वितरण टेबल पाहणारे संबंधित कर्मचारी यांचा अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे नाइलाजाने निधी वितरणास विलंब झाला होता. सोमवारी हा निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला असे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT