Crime  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime : धक्कादायक! जन्मदाती आईच बनली वैरीण; गरम तव्यावर बसवत केला पोटच्या गोळ्याचा छळ

आपल्या तीनही मुलांना घरात डांबून ठेवत ती एका व्यक्तीसोबत बाहेर निघून गेली

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक माहिती समोर आली असून एका आईनेच आपल्या पोटच्या लेकराचा छळ केल्याचं समोर आलं आहे. या महिलेने आपल्या सहा वर्षाच्या लेकराला चक्क गरम तव्यावर बसवल्याची आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

अधिक माहितीनुसार, या महिलेला तीन मुले असून एक व्यक्ती घरी आल्यानंतर तिने आपल्या तीनही मुलांना मारहाण करत घरात डांबून ठेवले. तर सहा वर्षाच्या सर्वांत लहान मुलाला गरम तव्यावर बसवत त्याला मारहाण करत ती सदर पुरूषाबरोबर बाहेर निघून गेली. काही वेळानंतर शेजारच्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या तीन चिमुकल्यांची सुटका केली. आईसोबत बाहेर गेलेला व्यक्ती आमचा वडील नसल्याचं या मुलांनी सांगितलं असून या मुलांची घाटी रूग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरू आहे. त्यानंतर त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पण ही धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : मुंबईला जाणारच, १२ तारखेला घोषणा करणार - मनोज जरांगे पाटील

SCROLL FOR NEXT