Waluj Crime News 
छत्रपती संभाजीनगर

तीन देशी पिस्तुलांसह २८ जिवंत काडतुसे जप्त, वाळूज परिसरात दोघे जेरबंद

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) - वाळूज परीसरात पिस्टल विक्री करणाऱ्या दोघांना वाळूज एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी (ता.६) अटक करून त्यांच्या ताब्यातून २ लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचे ३ देशी बनावटीच्या मॅगझीनचे पिस्टल व २८ जिवंत काडतुसे असे साहित्य जप्त करण्यात आले. यामुळे वाळूज परिसरात होणारा मोठा घातपात टळला.


याबाबत पोलीस आयुक्त निकेश खाटमोटे व पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले की, पोलीस निरिक्षक मधुकर सांवत यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की दोन व्यक्ती देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्यांनुसार पोलिस पथकांनी वाळूज परीसरातील वैष्णवदेवी मंदीरा जवळील रॉयल हॉटेल येथे सापळा रचला. त्यांनतर दुपारही २ वाजेच्या सुमारास दोन तरूण दुचाकीवरून येऊन हॉटेलमध्ये समोरील खुचीवर जाऊन बसले. हेच ते दोघे असल्याची खात्री होताच पोलिसांनी झडप मारून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता सचिन मुराब पवार (२९, रा. रामगव्हान वस्ती अंबड जि. जालना) व सुंदर भाऊसाहेब काळे (१९ रा. हिवरारोशनगाव ता.जि. जालना) अशी नावे त्यांनी सांगितली.

त्यांची झडती घेतली असता सचिनकडे १ पिस्टल व तीच्या मॅगझीनमध्ये २ जिवंत काडतुसे तसेच सुंदर काळे याच्या जवळील बॅगमध्ये २ पिस्टल व २६ जिवंत काडतुसे मिळूण आली. त्यांना पिस्तूल व काडतुसे बाळगण्याचा परवाना विचारला असता तो नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १ लाख २५ हजार रुपये किमतीचे ३ पिस्टल, २ हजार ८०० रुपये किमतीचे २८ जिवंत काडतुसे तसेच ८० हजार रुपये किमतीची एक दुचाकी (एम.एच.२१ बी.आर - ०३७३)असा एकूण २ लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचे साहित्य पोलीसांनी जप्त केले.
--
चौकट
--
पंधरा हजारांचे बक्षीस
--
या कारवाईमुळे वाळूज औद्योगिक वसाहतीतील मोठा घातपात टळला असून पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या वतीने वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT