छत्रपती संभाजीनगर

कोरोनाच्या धास्तीने शेतात गेले पण तिघांना मृत्यूने गाठले.. 

बाळु शिंदे

सोयगाव (जि.औरंगाबाद): कोरोनाच्या भीतीमुळे सुट्ट्यांमध्ये जवळ असलेल्या मामाच्या गावी गेलेले दोन भाचे आणि त्यांच्या मामांचा तलावात बैलगाडी उलट्याने बुडून मृत्यु झाला. शुक्रवार (ता.२७) रोजी मोलखेडा (ता.सोयगाव) येथे ही घटना घाडली. या प्रकरणी फर्दापुर पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली. 

सध्या सर्वत्र कोरोनाची भीती असल्याने नांदा तांडा शेतकरी असलेले श्‍यामराव राठोड यांच्या घरी शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांचे भाचे हे देव्हारी गावातून आले होते. ओम प्रकाश चव्हाण (वय १०) आणि त्याची बहिणी पल्लवी प्रकाश चव्हाण (वय १२) हे शुक्रवार (ता.२७) रोजी. मोलखेडा शिवारातील पाझर तलावात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले.

मात्र बैलगाडी न सोडता त्यांनी तसेच बैलगाडी पाझर तलावात नेली. यामध्ये बैल ओढले गेल्याने तलावात बैलगाडी उलटली. यात मध्ये मामा श्‍यामराव राठोड आणि त्यांचे भाची पल्लवी, प्रकाश यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच येथे गावकऱ्यांनी धाव घेऊन त्यांचा बाहेर काढले मात्र यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तसेच यामध्ये एका बैलाचा सुद्धा मृत्यू झाला. फर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT