covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाच्या काळात तीन महिन्यांत तीन लाखांवर नवीन वीजजोडण्या

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नऊ लाख नवीन वीजमीटर उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोनाच्या दुसऱ्या मोठ्या लाटेत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने उच्च व लघुदाबाच्या तब्बल ३ लाख १४ हजार ४०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वात महावितरणने ही उल्लेखनीय कामगिरी केली. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे वीजमीटरचा तुटवडा निर्माण झाला होता. तो दूर करण्यासाठी महावितरणने निविदा अंतर्गत पुरवठादारांना सिंगल फेजचे १८ लाख तर थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचे कार्यादेश यापूर्वीच दिलेले आहेत. त्याप्रमाणे आतापर्यंत सिंगल व थ्री फेजचे ९ लाख ५३ हजार नवीन वीजमीटर उपलब्ध झाले असून ते पुणे, नागपूर, औरंगाबाद व कल्याण प्रादेशिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत.

कोरोनाच्या गेल्या तीन महिन्यांत म्हणजे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत उच्चदाब वर्गवारीमध्ये उद्योग १७९, वाणिज्यिक २४, कृषी ७ आणि इतर ४० अशा एकूण २५० नवीन वीजजोडण्या तर लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती २ लाख ३३ हजार ४२७, वाणिज्यिक ३८ हजार २४, औद्योगिक ६६५०, कृषी-३१ हजार ४७५, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ३८३ व इतर ४,२०० अशा एकूण ३ लाख १४ हजार १५९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. यात औरंगाबाद परिमंडलातील १० हजार ६२७ जोडण्यांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यात ७ हजार ६०८ तर तर जालना जिल्ह्यात ३ हजार १९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

महावितरणने सिंगल व थ्री फेजच्या १९ लाख ७० हजार नवीन वीजमीटर उपलब्ध करुन दिले आहेत. आतापर्यंत सिंगल फेजचे ८ लाख ६८ हजार आणि थ्री फेजचे ८५ हजार मीटर उपलब्ध झाले आहेत. त्यात (कंसात थ्री फेज) पुणे प्रादेशिक कार्यालय- सिंगल फेज २ लाख ६९ हजार (३०,६०३), कोकण- सिंगल फेज ३ लाख २४ हजार (२५,७८७), नागपूर- १ लाख ९३ हजार (१८,३६०) आणि औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयास सिंगल फेजचे ८२ हजार व थ्री फेजचे १०,२५० नवीन वीजमीटर पाठविण्यात आलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT