तीन तालुक्याला एकच उपअभियंता
---
जळकोट : पाणी पुरवठ्याबाबतच्या कामकाजाचा खोळंबा
जळकोट शहर,ता.१९ : पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाला दोन तालुक्यांचा पदभार असलेला उपअभियंता नियुक्त करण्यात आलेला आहे. परिणामी, दुष्काळ भागात जलजीवन मिशनची कामे खोळंबत आहेत. त्यामुळे विविध गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीपुरवठा विभागाला कायमस्वरूपी उपअभियंता देण्याची मागणी सभापती सुनीता कोसंबे यांनी जिल्हा परिषदेत केली, मात्र कार्यवाही झालेली नाही.
जळकोट तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला. त्यातच अनेक गावांमध्ये सध्या पाणी टंचाईची स्थिती आहे. अशा स्थितीत पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाला उदगीर, शिरूर अनंतपाळ या दोन तालुक्यांचा पदभार असलेला उप अभियंता नियुक्त करण्यात आलेला आहे. तीन तालुक्यांचे कामकाज पाहताना उप अभियंत्याची धावपळ होत आहे. त्यातच दुष्काळाबाबतच्या सर्व बैठकांना उपअभियंत्यांना हजर राहणे अशक्य होत आहे. जळकोट पंचायत समितीच्या बैठकीत कायमस्वरूपी उपअभियंता नियुक्त करण्यात यावा, असा ठराव घेऊन तो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला. मात्र यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, चार दिवसात कायमस्वरूपी उप अभियंता नियुक्त न केल्यास कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सभापती सुनीता कोसंबे, उपसभापती माधव वाघमारे, पंचायत समिती सदस्य राजू केंद्रे आदींसह काँग्रेसचे सचिन केंद्रे, महताब बेग, महेश धुळशेट्टे, अक्षय बडगीरे यांनी दिला आहे.
कोट--
जळकोट पंचायत समितीच्या मासिक सभेत दोन वेळा ठराव घेऊन कायमस्वरूपी उप अभियंता नियुक्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद मिळत नाही.
-सुनीता कोसंबे, सभापती, पंचायत समिती
सध्या तालुक्यात भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाला कायमस्वरूपी उप अभियंता मिळणे गरजेचे आहे. याबाबत ठरावही घेतलेला आहे. मागणी मान्य न केल्यास जिल्हा परिषदेसमोर उपोषण करणार आहोत.
-प्रा.माधव वाघमारे, उपसभापती, पंचायत समिती.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.