sambhaji nagar  saka
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : शालेय पोषण आहार शिजवणाऱ्यांची वेळ निश्चित ; आता विनाकारण शाळेत थांबवून ठेवता येणार नाही

पोषण आहाराचे काम संपल्यानंतर त्यांना विनाकारण शाळेत थांबवून ठेवण्यात येऊ नये, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शासन निर्णयानुसार स्वयंपाकी तथा मदतनिसांनी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गतची सर्व कामे करणे आवश्यक आहे. पोषण आहाराचे काम संपल्यानंतर त्यांना विनाकारण शाळेत थांबवून ठेवण्यात येऊ नये, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील जवळपास सहा हजार स्वयंपाकी तथा मदतनीस महिलांना दिलासा मिळाला आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये मानधन तत्त्वावर स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत. सदर स्वयंपाकी तथा मदतनिसांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. त्यांना शासनाकडून दरमहा अडीच हजार रुपये मानधन देण्यात येते. २०११ च्या शासन निर्णयामध्ये मदतनीसांच्या कामकाजामध्ये शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे ही बाब नमूद आहे. याबाबत मदतनीस संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

याशिवाय योजने व्यतिरिक्त अन्य कामे न देणे व विनाकारण कामावरून काढून टाकू नये, अशी मागणी स्वयंपाकी तथा मदतनिसाच्या संघटनेने केली होती. त्यानुसार सोमवारी (ता.आठ) शासनाने स्वयंपाकी तथा मदतनीसांच्या कामकाजाबाबत सुधारीत निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार स्वयंपाकी, मदतनिसांना त्यांचे दैनंदिन कामकाजाची मर्यादित चार तासाची करण्यात आली आहे. या चार तासांत स्वयंपाकी, मदतनिसांनी शासन निर्णयानुसार विहित करून दिलेली सर्व कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. कामे संपल्यानंतर त्यांना विनाकारण शाळेत थांबवण्यात येऊ नये, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये एकूण ५ हजार ८८८ स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत. ८ जानेवारीच्या शासन आदेशानुसार या मदतनिसांना पोषण आहार योजनेअंतर्गतची सर्व कामे करणे आवश्यक आहे. पोषण आहाराचे काम संपल्यानंतर त्यांना विनाकारण शाळेत थांबून ठेवण्यात येऊ नये, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

- जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

मदतनिसांची कामे

  • पाककृतीनुसार विहित वेळेत आहार शिजवणे

  • तांदूळ व धान्याची साफसफाई करणे

  • शाळेत विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर आहार वाटप करणे

  • विद्यार्थ्यांच्या आहार सेवनानंतर जेवणाची जागा, स्वयंपाकगृहाची साफसफाई करून सांडलेल्या जेवणाची विल्हेवाट लावणे

  • पोषण आहारासाठी आवश्यक पाणी भरणे तसेच जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे

  • शाळास्तरावरील परसबागेची निर्मिती व देखभालीसाठी सहकार्य

  • अन्न शिजवताना वापरलेल्या भाजीपाला विषय नोंदी ठेवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT