Tips for trekking in Monsoon Season Sakal
छत्रपती संभाजीनगर

Monsoon Travel : मोह आवरा; स्वतःला सावरा! पावसाळी पर्यटन करताना अतिसाहसाने घडू शकते दुर्घटना

Tips for trekking in Monsoon Season : शहरातील अनेक हौशी तरुण व नागरिक हे गुगलवर सर्च करून ट्रेकिंगसाठी बाहेर पडत आहेत.

सुनील इंगळे

Chhatrapati Sambhajinagar : मॉन्सूनला सुरवात झाली. किल्ले, डोंगररांगा, दऱ्यांचा परिसर हिरवाईने नटत आहे. यात ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा अनेकांना मोह होता. लोणावळ्यात भुशी डॅममध्ये रविवारी (ता. ३०) एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. सोमवारी ताम्हिणी घाटात एक तरुण वाहून गेला. आपल्याकडेही अशी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पावसाळी पर्यटन करताना प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

शहरातील अनेक हौशी तरुण व नागरिक हे गुगलवर सर्च करून ट्रेकिंगसाठी बाहेर पडत आहेत. यात दर दिवशी ट्रेकवर जाणारे पाचशे ते हजार जणांची संख्या आहे. मात्र, यातील पाच टक्केच नागरिकांना तेथील निसर्ग व भौगोलिक परिस्थितीची माहिती असते.

उर्वरित ९५ टक्के हे हौशी तरुण केवळ रील, फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी येतात. ट्रेकच्या ठिकाणाची माहिती नसल्यामुळे अनेक तरुण हे आपला जीव धोक्यात घालतात. यामुळे ज्या ठिकाणी आपण ट्रेकला जात आहोत त्या ठिकाणाची भौगोलिक माहिती व सोबत तज्ज्ञ व्यक्ती असणे गरजेचे आहे.

पावसाळा सुरू झाला की अनेक तरुण मंडळी ट्रेकला जातात. पावसाचा आनंद लुटण्यासाठी शहरालगत अनेक दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि डोंगरांगांमध्ये तरुण मंडळी वर्षा विहाराचा आनंद लुटत असतात. मात्र, यातच अनेक तरुण अति उत्साहीपणा दाखवतात आणि जीव गमावतात.

आतापर्यंत अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. यात पावसाळ्यात अनेक जण नशा करून येत असतात. त्यामुळे तरुणांनी नशा करून ट्रेकला जाऊ नये, तसेच अनेक तरुण हे गुगलवर सर्च करून फिरायला निघतात.

मात्र, रस्ता भरकटल्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येतो. ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या स्थानिक (वाटाड्या) नागरिकाला सोबत घ्यावे, अनेक धोकाच्या ठिकाणापासून ती व्यक्ती आपल्याला वाचवत असते व वाट दाखवून तुम्हाला सुरक्षित स्थळी नेऊन पोचवू शकते, यामुळे वाटाड्या सोबत असणे महत्त्वाचे आहे.

ज्या ठिकाणी आपण ट्रॅक करायला जात आहोत त्या ठिकाणाची भौगोलिक माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, स्थानिक नागरिक सोबत असावा व ट्रेकला जात असताना घरच्यांना त्याची माहिती द्यावी.

— आदित्य पिल्दे, संभाजीनगर ट्रेकर्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

आधी आक्रमक सेंडऑफ अन् नंतर विराट-गिलचा ब्रोमान्स.... GT vs RCB सामन्यानंतरचा Video Viral

Latest Marathi News Live Update : महाकालेश्वर मंदिर परिसराच्या जवळ सुरू असलेल्या उत्खनन कामादरम्यान विशाल शिवलिंग सापडले

Chandrapur: अर्पिताच्या संशयास्पद निधनची चौकशी करा; कुटुंबीयांची मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

Bank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बँका बंद! RBI ची अपडेट; व्यवहाराआधी पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT