छत्रपती संभाजीनगर

आजपासून परभणी बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डात कापूस खरेदी सुरू

CD
मोठी सिंगल... टीएमसी मार्केट यार्डात आजपासून कापूस खरेदी परभणी, ता. १७ : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डात गुरुवारी (ता. १९) खासगी व्यापाऱ्यांमार्फत कापूस खरेदीला प्रारंभ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मार्केट यार्डात कापसाची वाहने आल्यानंतर क्रमवार लावून जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कापसाची वाहने घेऊन जावीत. कोणत्याही परिस्थितीत जिनिंग आवारात परस्पर वाहने घेऊन जाता येणार नाहीत. सकाळी ११ वाजेपर्यंत टीएमसी मार्केट यार्डात कापूस आणणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कापूस स्वच्छ स्वरूपात असावा. चांगल्या व खराब प्रतीचा कापूस वेगवेगळा करून आणल्यास संबंधित कापसाला योग्य व अधिक बाजारभाव मिळण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची प्रतवारी करूनच विक्रीस आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात काही व्यापारी विनापरवाना शेतमालाची खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधावा. अनधिकृत व्यापाऱ्यांकडून होणारी खरेदी-विक्री टाळून अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांकडेच शेतमालाची विक्री करावी व अधिकृत हिशेबपावती घ्यावी, असेही आवाहन सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण, संचालक मंडळ व सचिव संजय तळणीकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA अधिकारी बनून पानटपरीवर धाड, बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, ६ जणांना अटक; २.६६ लाखांची रोकड जप्त

Dhoni Retirement: "तू आमचा थाला अन् कर्णधार नेहमीसाठीच राहशील...", ऋतुराज गायकवाडची धोनीसाठी भावूक पोस्ट

१३ वर्षांचा वनवास संपला! नागपुरात रंगणार महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम; १३०० मल्ल दाखवणार कुस्तीचा दम, 'या' तारखेला आयोजन

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

सिडकोची घरं धोकादायक, पाच वर्षांतच इमारतींची दुरवस्था; कुठे स्लॅब कोसळतोय, तर कुठे भिंतींना तडे

SCROLL FOR NEXT