gutka  sakal
छत्रपती संभाजीनगर

Tobacco : तरुणांमध्ये गुटख्याचे वाढते व्यसन ; बंदी असूनही चोरट्या मार्गाने सर्रास विक्री सुरूच

गुटख्याची पावडर आणि सुगंधी सुपारी अशी दोन वेगवेगळ्या पुड्या विक्री केल्या जातात.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा बंदीचा निर्णय झाला. या कायद्याला अकरा वर्षे पूर्ण होत आहे. मात्र, कडक अंमलबजावणी अभावी गुटखा बहुतांश टपरी तसेच काही किराणा दुकानात अगदी सहजपणे मिळतो. बाहेरील राज्यातून गुटखा चोरट्या मार्गाने विक्रीस येतो. मात्र, त्यावर कडक कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील तरुण आणि जेष्ठांमधील गुटख्याचे व्यसन कायम आहे.

५ ऑगस्ट २०११ पासून अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला. या कायद्यांतर्गत अन्न सुरक्षा व मानके नियम २०११ व विनियमन २०११ यांचा समावेश आहे. ‘अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६’ अंतर्गत महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे.

मात्र, कायद्यातून पळवाट काढून राज्यात ठिकठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची सहजपणे, सर्वत्र विक्री होत आहे. गुटख्याची पावडर आणि सुगंधी सुपारी अशी दोन वेगवेगळ्या पुड्या विक्री केल्या जातात.

या दोन्हींचे मिश्रण एकत्र केल्यावर पुर्वीसारखा तंबाखूजन्य गुटखा तयार होतो. एक पुडी घ्यायची तर ती पाच, दहा, वीस आणि पन्नास रुपयांना मिळते. यामध्ये २० आणि ४० पुड्यांचे पॉकेट तयार करुन टपरी चालक, दुकानदारांना विक्री केले जाते.

परराज्यातून होतेय आवक

राज्यात गुटखा विक्री करण्यासाठी मोठे रॅकेट आहे. जवळच्या कर्नाटक राज्यातून सर्वाधिक गुटखा चोरट्या मार्गाने विक्री आणला जातो. त्यानंतर तो होलसेल विक्रेत्याकडे विक्रीसाठी पाठवला जातो. होलसेलर्स ठोक, घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या विक्रेत्यांना गुटखा पुड्यांचे बॉक्स विक्रीसाठी देतात. हे ठोक विक्रेते थेट टपऱ्या, दुकानांवर डिलिव्हरी करतात. त्यांच्यावर कडक कारवाई होत नसल्याने आज गुटखा अगदी सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे कायदा करून सुद्धा त्याचा उपयोग झाला नाही.

तोंडाचे आकुंचन, कर्करोग तरी देखील मागणी

गुटख्यात सुपारीवर प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे तो आरोग्यासाठी घातक व धोकादायक असतो. त्यात मॅग्नेशिअम कार्बोनेटसारखे घातक घटक असतात. त्याचा दुष्परिणाम गालाच्या आतील आवरणावर होतो. गुटखा खाणाऱ्यांचे तोंड आकुंचन पावते. त्याला व्यवस्थित जेवताही येत नाही. तसेच काहीजणांना मुख कर्करोग होतो. तरीही तरुणांमधील व्यसनाचे प्रमाण कमी होत नाही. गुटखा, सुगंधी तंबाखुची विक्री जोरात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

‘मला काय होतंय ते पाहायचं होतं’ हार्ट अटॅकनंतर पूर्ण शुद्धीत सुष्मिता सेनने सर्जरी केली

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

SCROLL FOR NEXT