adv vishnu kande esakal
छत्रपती संभाजीनगर

मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या निवडणुकीत अहमदपूरचे अ‍ॅड. विष्णु कंदे यांचा दणदणीत विजय

या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. योगिता थोरात, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. मोरमपल्ले, सचिवपदी अ‍ॅड. श्रीकृष्ण चौधरी आणि कोषाध्यक्षपदी अ‍ॅड. विनायक सोलंके यांनी विजय संपादन केला आहे. तसेच अ‍ॅड. विष्णु कंदे यांच्या निवडीलाही सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

CD

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अहमदपूर तालुक्यातील धानोरा (बु.) येथील सुपुत्र अ‍ॅड. विष्णु कंदे यांनी तब्बल ९४८ मते मिळवत भक्कम विजय संपादन केला आहे. त्यांच्या या यशामुळे अहमदपूर तालुक्याचा मान संपूर्ण मराठवाड्यात उंचावला आहे.

अ‍ॅड. कंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद खंडपीठात यशस्वीपणे वकिली करत असून, गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि न्यायाच्या तत्वांवर आधारित वकिली करून अनेक नामवंत वकिलांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सेवेसाठी लातूर जिल्ह्यासह अहमदपूर, चाकूर व परिसरातील विविध तालुक्यांतील नागरिक मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे येतात.

या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. योगिता थोरात, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. मोरमपल्ले, सचिवपदी अ‍ॅड. श्रीकृष्ण चौधरी आणि कोषाध्यक्षपदी अ‍ॅड. विनायक सोलंके यांनी विजय संपादन केला आहे. तसेच अ‍ॅड. विष्णु कंदे यांच्या निवडीलाही सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अ‍ॅड. विष्णु कंदे यांच्या या दणदणीत विजयाबद्दल अहमदपूर तालुक्यात, विशेषतः त्यांच्या मूळगावी धानोरा (बु.) येथे आनंदाचे वातावरण असून, सर्वत्र त्यांचे जोरदार अभिनंदन होत आहे. पुढील कार्यासाठी त्यांना अनेकांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: पंथ-संप्रदायापासून मंत्र्यांना दूर ठेवा, जिथं घुसतात तिथं आग लावतात, नितीन गडकरंनी स्पष्ट सांगितलं

धक्कादायक! 'विठुरायाच्या लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये आळी'; मंदिर समितीच्या भोंगळ कारभारामुळे भाविकांमध्ये नाराजी

Thane News: दीड वर्षानंतर कोपरीकरांसाठी पायवाट मोकळी, भाजप माजी नगरसेवकाच्या प्रयत्नांना यश

TikTok News : भारतात टिकटॉकची पुन्हा एन्ट्री? वेबसाईट सुरु झाल्याचा दावा अन् आता कर्मचारी भरती...नेमका विषय काय?

दुर्दैवी घटना! 'सोलापूरमध्ये घरात गॅस लिकेज; दोन चिमुकल्यांचा मृत्यू', बेशुद्ध तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT