छत्रपती संभाजीनगर

दुष्काळाच्या झळांनंतर आगीचा घाला; सोयाबीनची सुडी जळून खाक

CD
नेवरवाडीमध्ये सोयाबीनची सुडी, धोतऱ्यात शॉर्टसर्किटने ऊस खाक ---- हदगाव, ता. ८ (बातमीदार): तालुक्यातील नेवरवाडी येथे शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुडीला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने संपूर्ण सोयाबीन खाक झाले. या घटनेत शेतकरी दत्ता बोडके यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, ऐन संकटाच्या काळात त्यांच्यावर दुहेरी संकट कोसळले. दत्ता बोडके यांनी सोयाबीनची सोंगणी करून शेतात सुडी घातली होती. रात्री अचानक सुडीला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण सोयाबीन खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील धोतरा येथेही शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. शेतकरी रंजना सुरेश सूर्यवंशी यांच्या शेतातील ऊस पिकाला आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाल्याची माहिती दयानंद सूर्यवंशी यांनी दिली. शेतातील वीजवाहिन्या, विद्युत खांब व उपकरणांची तातडीने तपासणी करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशी मागणी होत आहे. दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च, बाजारभाव आणि आगीसारख्या संकटांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढत आहे. त्यामुळे महसूल विभागाने दोन्ही घटनांचे तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घ्यावा आणि नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT