छत्रपती संभाजीनगर

पान २ साठी

CD
------- सिद्धार्थ जगतापची विभागीय स्कॉड स्केटिंग स्पर्धेसाठी निवड बीड ः शहरातील श्री शिवाजी विद्यालयातील विद्यार्थी सिद्धार्थ अनिरुद्ध जगताप याची १४ वर्षांखालील स्कॉड स्केटिंग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. त्याची आता विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला शाळेतील क्रीडाशिक्षक सुधीर कोल्हे, डी. जे. मस्के, जटाळ यांनी मार्गदर्शन केले. या यशस्वी विद्यार्थ्याचे सचिव दिनकर कदम, पदाधिकारी आसाराम सुर्वे, शकुंतला लोळगे, पवन चौरे, शितल कदम, मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे, एच. आर. सावंत, पर्यवेक्षक राजेंद्र भावसार, पर्यवेक्षक गिरीष चाळक यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. ----- मुरघास व कडबा कुट्टी मशीनचे वाटप पाटोदा ः विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी आणि वाघिरा येथे ७ ऑक्टोबरला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते पशुपालकांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यात ७० लाभार्थींना ३१.५ टन मुरघास, ३ जणांना कडबा कुट्टी मशीन, ६३ जणांना चारा बियाणे व १० जणांना एचजीएमचा लाभ देण्यात आला. तसेच, २० पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना व्हाइट साईड टेस्ट संच वितरित करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मदत करावी, अशी सूचना जितीन रहमान यांनी केली. यावेळी प्रकल्प संचालक डॉ. संजय गोरानी, अतिरिक्त आयुक्त डॉ. शितल कुमार मुकणे, डॉ. सचिन संकपाल आणि डॉ. आर. डी. कदम उपस्थित होते. ------ सरस्वती महाविद्यालयात भाषा विभागांतर्गत अतिथी व्याख्यान संपन्न केज ः येथील माऊली विद्यापीठ संचलित सरस्वती महाविद्यालयात मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विभाग व आयक्युएसी अंतर्गत अतिथी व्याख्यान संपन्न झाले. डॉ. छत्रभुज सोळंके यांनी नाट्यलेखन, कथानक व संवादाचे महत्त्व स्पष्ट केले. इंग्रजी विभागाचे डॉ. रामेश्वर सोळुंके यांनी स्पर्धात्मक युगात संवाद कौशल्याचे महत्त्व पटवून दिले, तर हिंदीच्या डॉ. केदार आर. डी. यांनी हिंदी साहित्याच्या इतिहासाचा आढावा घेतला. अध्यक्षस्थानावरून उपप्राचार्य डॉ. के. एम. धिमधिमे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. सीता केंद्रे, सूत्रसंचालन डॉ. सारिका बुरगे तर आभार डॉ. संतोष मस्के यांनी मानले. यशस्वितेसाठी डॉ. पठाण पी. वाय. व डॉ. वैशाली आहेर यांनी परिश्रम घेतले. ------ ग्लोबल विकास ट्रस्टच्या उपक्रमांना सरकारचे बळ परळी ः ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या जल, जमीन आणि जंगल संरक्षण व संवर्धन उपक्रमास राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी ट्रस्टचे अध्यक्ष मयंक गांधी यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या महत्त्वाकांक्षी उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी ग्लोबल विकास ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील भागीदारी सामंजस्य कराराद्वारे औपचारिक करण्याची तयारी दर्शवली. या बैठकीत ५० हजार शेतकऱ्यांसाठी क्लस्टर आधारित उपजीविका, २५ हजार शेतकऱ्यांना रेशीम शेतीशी जोडणे, ग्रामीण रोजगार आणि जलसंधारणासाठी १ हजार किलोमीटर लांबीच्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत चर्चा झाली. ------ स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचा दबदबा अंबाजोगाई ः छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवा महोत्सव पार पडला. यात अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या संघाने सर्वोत्कृष्ट ग्रामीण संघाची ढाल तसेच उत्कृष्ट वाङ्मय संघाची ढाल पटकावली. याशिवाय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम व प्रहसन या नाट्यप्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली. या यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक आणि कलात्मक क्षेत्रातील योगदानाला विद्यापीठस्तरावर पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले आहे. विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवलेली सर्जनशीलता, संघभावना आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे परीक्षक व रसिकांकडून त्यांचे भरभरून कौतुक झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT